दिवाळीत प्रदूषणापासून स्वतःचा करा बचाव : भारतामधील विविध शहरामधील वातावरण त्याचबरोबर हवेच्या गुणवत्तेची स्थती प्रचंड खराब आहे. तरीसुद्धा दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात आणि प्रदूषणामध्ये आणखी भर पडते. दिल्ली एनसीआर सामान्यत: हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत सर्वात जास्त प्रभावित आहे. आणि या म्हणीप्रमाणे, सावधगिरी ही उपचारापेक्षा चांगली आहे. सणांच्या दरम्यान वायू प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क घाला. त्याचबरोबर प्रदूषणामुळे त्वचा आणि डोळ्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे घराबाहेर पडताना चष्मा लावा. जर तुम्ही फेस मास्क घालून बाहेर जात असाल तर त्याला वारंवार हात लावू नका. केवळ बाहेरची हवाच नाही तर घरातील हवा देखील प्रदूषित असते, त्यामुळे घराची धूळ नियमितपणे साफ करा राहा. घराबाहेरचा रस्ता ओला करा. असे केल्याने दूषित धुळीचे कण हवेत उडणार नाहीत.
प्रदूषणामुळे तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हे पदार्थ खा