
देवालाही थंडी वाजते....पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल
महाराष्ट्राच्या या हिल स्टेशनला ‘इटली’ म्हटले जाते, पण का? सुंदरता पाहून पर्यटक होतात आकर्षित
पुणेकरांसाठी विशेष असलेले मंदिर
सारसबाग गणपती हे स्थानिकांसाठी केवळ मंदिर नाही, तर पुण्याची माणसं वर्षानुवर्षे जपलेली भावना आहे. बाप्पाला ऊनी कपडे घालण्याची ही रीत अगदी जुनी असून ती केवळ थंडीपासून संरक्षणासाठी नसून भक्तांच्या प्रेमाची अभिव्यक्तीही आहे. हाताने विणलेले स्वेटर आणि शाल या जागेच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा पुरावा देतात. थंडी वाढू लागली की येथे दर्शनासाठी गर्दीही वाढते. अनेक कुटुंबे दरवर्षी या काळात आवर्जून दर्शनासाठी येथे येतात.
मंदिरात काय पाहू शकता
या पवित्र जागी दर्शनानंतर पर्यटक मंदिर परिसरातील संग्रहालयात गणेशाच्या विविध देखण्या मूर्ती आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन घेऊ शकतात. शांत बगीच्यांत फिरत वेळ घालवणेही अनेकांना आवडते. लहान मुलांसाठी छोटं खेळण्याचं उद्यानही आहे, जिथे ते मनसोक्त मजा करू शकतात. सारसबाग गणपतीला भेट दिल्यानंतर भेट देण्यासाठी परिसरात अनेक प्रसिद्ध देवस्थानं आहेत. अगदी जवळच (सुमारे 1 किमी) पार्वती मंदिर आहे, जे पार्वती माता आणि भगवान शिवाला समर्पित आहे. तसेच श्री महालक्ष्मी मंदिर साधारण 500 मीटरवर आहे. जैन समाजासाठी महत्त्वाचे असे श्री श्वेतांबर जैन मंदिरही इथून फक्त 300 मीटरच्या अंतरावर आहे.
दर्शनाची वेळ
सारसबाग गणपती मंदिरात प्रवेश विनामूल्य आहे. मात्र मंदिरातील संग्रहालय पाहण्यासाठी अंदाजे 5 रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. दर्शनासाठी मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत खुले असते. दररोज सकाळी 5:30 वाजता पंचामृत पूजेद्वारे दिवसाची सुरुवात होते. सकाळची आरती 6:40 वाजता तर संध्याकाळची आरती 7:15 वाजता केली जाते.
मंदिरात कसे पोहोचाल
पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे जाणे सोपे आहे. पर्यटक कार भाड्याने घेऊ शकतात किंवा ऑटोरिक्षाचा उपयोग करू शकतात. पुणे इंटरनॅशनल विमानतळापासून मंदिर अंदाजे 14 किमी अंतरावर तर पुणे रेल्वे स्थानकापासून जवळपास 6 किमी आहे. इतर शहरांतून बसने येणाऱ्या प्रवाशांनी एमएसआरटीसी बस स्थानकात उतरावे. तेथून मंदिराचा प्रवास अंदाजे 6 किमी आहे. बस व रेल्वे स्थानक या दोन ठिकाणांहून सारसबाग रोडला पोहोचायला साधारण 17 मिनिटे लागतात.