फोटो सौजन्य: Freepik
आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण म्हणजे आपलं लग्न. आपल्या संस्कृतीमध्ये लग्न हे फक्त दोन व्यक्तींपुरतं मर्यादित नाही आहे. हा एक सोहळा आहे ज्याला आपण लग्न सोहळा म्हणतो. आपल्याकडे तर लग्न म्हणजे स्वर्गात बांधलेल्या गाठीच.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे लग्न ठरते तेव्हा आपल्या जोडीदाराकडून त्याच्या अनेक अपेक्षा असतात. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही आहे. तेव्हा सुखी संसारात वादाची ठिणगी पडते. जर तुमचे सुद्धा लग्न ठरले आहे तर मग तुम्ही तुमच्या पार्टनरला काही महत्वाचे प्रश्न विचारले पाहिजे. या प्रश्नांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या पार्टनरला अधिक उत्तम पद्धतीने जाणून घ्याल. चला जाणून घेऊया, तुम्ही कोणते प्रश्न विचारले पाहिजे.
तुमच्या भावी आयुष्याच्या जोडीदाराला म्हणजेच त्याला किंवा तिला लग्न का करायचे आहे हे जरूर विचारा. वास्तविक, यावरून तुम्हाला कल्पना येईल की तुमच्या पार्टनरला लग्नाकडून तुमच्यासारख्याच अपेक्षा आहेत कि नाही.
हे देखील वाचा: 1-1-1-1 मॅरेज रूल्सचा वाढतोय ट्रेंड, डेटपासून शारीरिक संबंधापर्यंत नातं होईल घट्ट
हा प्रश्न तुम्हाला थोडा बालिश वाटू शकतो, पण तुमच्या जोडीदाराने तुमच्यात कोणती खास गोष्ट पाहिली, ज्याच्या आधारे त्याने लग्नाला होकार दिला हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यावरून तुमचा पार्टनर तुम्हाला किती महत्त्व देतो याची तुम्हाला कल्पना येईल.
तुम्ही तुमच्या पार्टनरला हे देखील विचारले पाहिजे की तू शनिवार व रविवार कसा घालवतोस किंवा घालवतेस. जर तुम्हाला लग्नानंतर तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला एन्जॉय करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या पार्टनरला वेळ कसा घालवायला आवडतो हे जाणून घ्या.
हा प्रश्न फक्त मुलींना नाही तर मुलांना सुद्धा विचारला पाहिजे. या प्रश्नाने दोघांना जेवण बनवायची आवड आहे कि नाही ते समजेल.
काही घरांमध्ये पुष्कळ पूजा पाठ चालू असते तर काही लोकं ठराविक वेळीच पूजा करणे पसंत करतात. त्यामुळे लग्नानंतर अध्यात्माबाबत कोणाच्यातरी सवयी तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींवर बोलणे गरजेचे आहे.
हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. या प्रश्नाच्या साहाय्याने तुम्हाला हे समजण्यास मदत होईल की तुमच्या दोघांच्या लग्नाबाबत समान अपेक्षा आहेत की दोघांचे वेगळे विचार आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून एकमेकांबद्दल गैरसमज होणार नाही.
तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे त्याच्या कुटुंबाशी कोणत्या प्रकारचे नाते आहे हे जाणून घ्या. हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पार्श्वभूमी आणि कुटुंबाबद्दल माहिती देईल.