
सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी
दरवर्षी ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा केली जाते. त्या भारतातील समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवियित्री आणि पहिल्या भारतीय शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत महिलांचे अधिकार सुधारण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी आपले जीवन शिक्षणाद्वारे महिला आणि अस्पृश्यांच्या उन्नती साक्षरतेसाठी समर्पित केले होते. सावित्रीबाईंनी शिक्षण आणि समाज कार्याच्या क्षेत्रात समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना खूप जास्त सहकार्य केले. त्यानंतर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्यामुळे पुण्यात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरु करण्यात आली. पण त्यांना मुलींना शिक्षण देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चला तर जाणून घेऊया सावित्रीबाई फुलांचे जीवनास प्रेरणा देणारे विचार.(फोटो सौजन्य – pinterest)
“शिक्षणामुळे माणूस स्वतःला ओळखू लागतो, त्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे.”
“स्वाभिमानाने जगण्यासाठी सगळ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. शाळा हा सर्वोत्तम दागिना आहे.”
“अज्ञानावर सर्वांनी मात केली पाहिजे. त्यावर मात करण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे.”
“मुलीच्या लग्नापूर्वी तिला शिक्षण द्या, त्यामुळे तिला चांगले आणि वाईट यातील फरक कळेल.”
“ज्ञानाशिवाय आयुष्याला अर्थ नाही , बुद्धीशिवाय आपण प्राणी बनतो. ज्ञानाच्या दिव्याने मनं उजळून टाका.”
“पुरुषप्रधान समाजाला महिलांच्या समानतेची इच्छा कधीच वाटणार नाही. महिलांना स्वतःला सिद्ध करावे लागेल. अन्याय आणि गुलामगिरीच्या विरोधात लढावे लागेल.”
“लेखणी तलवारीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे, जेव्हा ती शिक्षणासाठी वापरले जाते.”
“तुम्हाला जितके अधिक माहिती असेल किंवा शिक्षण असेल तितकी तुम्हाला भीती वाटण्याची शक्यता कमी आहे.”
“बंधनातून मुक्त होऊन महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे.”
“ज्ञानाचा दीप पेटवून अंधार दूर करणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! तुमचे विचार आम्हाला नेहमी मार्गदर्शक ठरतील.”
शिक्षण स्वर्गाचे दार खुले करतात, स्वतःला ओळखण्याची एक संधी मिळते.
जागे व्हा, उठा आणि शिक्षित व्हा, परंपरा मोडून काढा. मुक्त व्हा.
स्वाभिमानाने जघण्यासाठी शिक्षण घ्या, शिक्षणच माणसाचा खरा दागिना आहे.
– शिक्षण हे महान समता आहे आणि ते आपल्याला आपल्या गुहांमधून काळोखातून बाहेर काढेल.
आळस हे गरिबीचे लक्षण आहे. आळस ज्ञान, संपत्ती आणि सन्मानाचा शत्रू आहे आणि आळशी माणसाला हवे ते काहीही मिळत नाही.
शिक्षण नसलेली स्त्री मुळे किंवा पाने नसलेल्या वटवृक्षासारखी आहे; ती आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही आणि स्वतःही जिवंत राहू शकत नाही.
शिकण्याची कमतरता म्हणजे घोर पाशवीपणाशिवाय दुसरे काहीही नाही. ज्ञानाच्या प्राप्तीमुळेच व्यक्ती आपला खालचा दर्जा गमावून उच्च स्थान प्राप्त करते.
आपण मात करू आणि भविष्यात यश आपलेच असेल. भविष्य आपले आहे.
प्रत्येक स्त्री मुक्तीसाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे असे मी मानते.
जागे व्हा, उठा आणि शिक्षित व्हा, परंपरा मोडून काढा. मुक्त व्हा.
थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास
जर तुमच्याकडे ज्ञान नसेल, शिक्षण नसेल, त्याची तळमळ नसेल, तुमच्याकडे बुद्धी असेल पण काम नसेल तर तुम्हाला माणूस कसे म्हणायचे?