Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम फक्त दोन जणांचं नाही! Gen Z जनरेशनला प्रेमात लागते मित्रांच्या परवानगीची गरज; वाढत चाललाय नवा ट्रेंड

आजच्या जेन झी पिढीत प्रेम हे फक्त दोन लोकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मित्र-मैत्रिणींचं मत, परवानगी आणि सहभाग यामुळे डेटिंगमध्ये एक नवा ट्रेंड उदयास आला आहे, ज्याला ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’ म्हणतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 02, 2026 | 01:46 PM
प्रेम फक्त दोन जणांचं नाही! Gen Z जनरेशनला प्रेमात लागते मित्रांच्या परवानगीची गरज; वाढत चाललाय नवा ट्रेंड

प्रेम फक्त दोन जणांचं नाही! Gen Z जनरेशनला प्रेमात लागते मित्रांच्या परवानगीची गरज; वाढत चाललाय नवा ट्रेंड

Follow Us
Close
Follow Us:
  • जोडीदार निवडण्यापासून नात्याबाबत निर्णय घेण्यापर्यंत मित्र-मैत्रिणींच्या मताला जेन झी खूप महत्त्व देते.
  • डेटिंगदरम्यान लाईव्ह लोकेशन, कोड वर्ड, व्हॉट्सॲप ग्रुप्समुळे मित्र हे भावनिकच नव्हे तर सुरक्षिततेचं कवच ठरत आहेत.
  • जास्त सल्ले घेतल्याने गोंधळ वाढू शकतो; मित्र मार्गदर्शन करतात, पण शेवटी निर्णय आणि भावना वैयक्तिक असतात.
आजच्या ‘जेन झी’ पिढीमध्ये प्रेमात मित्रांची परवानगी किवा त्यांचा प्रभाव वाढला आहे, ज्याला ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’ म्हणतात: यामध्ये मित्र-मैत्रिणीच्या मताला महत्त्व देऊन जोडीदार निवडणे, नात्याबद्दल सल्ला घेणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींना डेटिंगमध्ये सामील करून घेणे अशा गोष्टीचा समावेश होतो, ज्यामुळे आजच्या डेटिंगमध्ये मित्रांची भूमिका महत्त्वाची ठरते.

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान मोबाईल

सोशल मीडियामुळे मित्र-मैत्रिणीसोबत सतत संपकांत राहणे सोपे झाले आहे, ज्यामुळे ते डेटिंगच्या निर्णयात थेट हस्तक्षेप करतात. मित्र-मैत्रिणींच्या मतांचा आणि मान्यतेचा तरुणांवर खूप प्रभाव असतो; ते जोडीदाराला ‘ओके’ म्हणत नाहीत तोपर्यंत अनेकदा नवीन नात्यात पुढे जात नाहीत.

सुरक्षितता आणि पडताळणी

मित्र-मैत्रिणींच्या मदतीने जोडीदाराची पार्श्वभूमी तपासणे किंवा तो खरोखरच योग्य आहे का, हे पडताळणे सोपे होते, असे या पिढीला वाटते. आजच्या डेटिंगमध्ये अनेक बारकावे असतात, त्यामुळे मित्र-मैत्रिणीच्या अनुभवावरून आणि सल्ल्यावरून अनेकदा निर्णय घेतले जातात. थोडक्यात, जेन झी साठी प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधील गोष्ट राहिली नसून, त्यात मित्रांचा सहभाग आणि त्यांची ‘परवानगी’ महत्त्वाची ठरते, असे आजच्या ट्रेंडवरून दिसते.

मित्रमंडळी करतात सावध डेटिंग इतके

गोंधळात टाकणारं झालंय की लोक स्वतःच्या भावनांपेक्षा मित्रांच्या अनुभवांवर जास्त विश्वास ठेवू लागले आहेत. चुकीच्या नात्यांमुळे झालेली वेदना, फसवणूक किंवा गैरसमज मित्रांनी जवळून पाहिलेले असतात. त्यामुळे “सावध रहा” हा सल्ला आपोआपच महत्त्वाचा ठरतो. अनेकदा मित्र एखादी छोटी गोष्टही मोठा इशारा म्हणून दाखवतात आणि त्यामुळे नात्याबद्दल शंका निर्माण होते. आजच्या काळात खरं डेटिंग ॲप म्हणजे मित्रांचा व्हॉट्सॲप ग्रुप झाला आहे. डेटपूर्वी कपड्यांवर चर्चा, डेटनंतर सविस्तर अपडेट्स, स्क्रीनशॉट्स शेअर करणं हे सर्वसाधारण झालं आहे. विशेषतः महिलांसाठी मित्र हे भावनिकच नव्हे तर सुरक्षिततेचं कवचही ठरतात. लाईव्ह लोकेशन शेअर करणं, कोड वर्ड ठरवणं, वेळेवर कॉल करणं या सगळ्यातून ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’चा सकारात्मक पैलू दिसतो.

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

मानसिक सुरक्षितता, भावनिक आधार अधिक महत्वाचा

मात्र याची दुसरी बाजूही आहे. खूप जास्त मतं घेतली गेली तर आकर्षण कमी होऊ शकतं, कधी कधी मित्र स्वतःच्या भूतकाळातील अनुभवांची छाया तुमच्या नात्यावर टाकतात. एखादी साधी सवयही ‘रेड फ्लॅग’ वाटू लागते. मित्रांना एखादी व्यक्ती खूप आवडली, तर नाते तोडणंही कठीण होते, जरी स्वत: ला ते नातं योग्य वाटत नसलं तरी, जेन झी आणि तरुण मिलेनियल्समध्ये हा ट्रेंड अधिक दिसतो, त्यांच्यासाठी मानसिक सुरक्षितता, भावनिक आधार आणि कम्युनिटी महत्त्वाची आहे.  प्रेम है एकट्याचं न राहता मित्रपरिवारात मिसळलेलं असतं.त्यामुळे मित्रांचा सहभाग त्यांना नैसर्गिक वाटतो. ‘फ्रेंडफ्लुएन्सिंग’ पूर्णपणे वाईट नाही, पण समतोल गरजेचा आहे. मित्र मार्गदर्शन करू शकतात, इशारे देऊ शकतात, पण शेवटी भावना तुमच्याच असतात, प्रेम वैयक्तिक असतं, जरी ते एकट्यानं जगलं जात नसलं तरी.

Web Title: Love is no longer just between two people gen z seeks friends approval in relationships a new trend on the rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Gen Z
  • lifestyle news
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान
1

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल
2

दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
3

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
4

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.