Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!

Ragi Idli Recipe : नाचणीच्या इडल्या अतिशय सॉफ्ट, पोषणमूल्यांनी भरलेल्या आणि कुठल्याही वेळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरतात. पुढच्या वेळी इडल्या बनवाल तेव्हा तांदळाच्या नाही तर नाचणीच्या इडल्या बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 14, 2025 | 10:36 AM
Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी 'नाचणीची इडली' करून खा!

Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी 'नाचणीची इडली' करून खा!

Follow Us
Close
Follow Us:
  • सकाळच्या नाश्त्यासाठी चविष्ट आणि हेल्दी नाचणीची इडली एक उत्तम पर्याय ठरते
  • नाश्ता हा कधीही पौष्टिक करावा
  • ही रेसिपी फार झटपट आणि कमी वेळेत तयार होते
भारतीय आहारात बाजरी, नाचणी, ज्वारी, नाचणीसारख्या कडधान्यांचा आणि मिलेट्सचा वापर पुन्हा वाढायला लागला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा नाश्ता शोधताना ‘रागी इडली’ हा एक उत्तम पर्याय ठरतो. नाचणीला ‘फिंगर मिलेट’ असे म्हणतात आणि ही धान्ये कॅल्शियम, लोह, फायबर व प्रोटीनने समृद्ध असतात. त्यामुळे रागी इडली केवळ चविष्टच नाही तर शरीराला पोषण देणारी, उर्जा वाढवणारी आणि पोटभर नाश्त्याची हेल्दी निवड आहे.

थंडीत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पौष्टीक डिंकाचे लाडू, जाणून घ्या लाडू बनवण्याची योग्य पद्धत आणि साहित्याचे प्रमाण

दक्षिण भारतात इडली हा दररोजचा पदार्थ आहे, परंतु पारंपरिक तांदळाच्या इडलीला नाचणीची जोड दिली की त्या इडल्या अधिक मऊ, हलक्या आणि पोषणमूल्यांनी भरलेल्या तयार होतात. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी योग्य, तसेच डायटवर असणाऱ्यांसाठीही ही इडली उत्तम ठरते. नाचणीच्या इडलीची ही रेसिपी फार सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. चला तर मग लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • नाचणी पीठ – 1 कप
  • उडीद डाळ – ½ कप
  • पोहे (धुतलेले) – 2 टेबलस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – इडली प्लेटला लावण्यासाठी
रसाळ, नरम अन् तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला पण साखरेचा नाही तर गुळाचा… नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ नीट धुवून 3-4 तास भिजत ठेवा. यामुळे दाणे फुलतात आणि वाटायला सोपे होते.
    भिजलेली डाळ, पोहे आणि थोडे पाणी घालून अगदी हलके, फेसाळ आणि मऊ असे बॅटर तयार करा. इडलीचे पीठ हलके असले की इडल्या मऊ होतात.
  • एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या. त्यात थोडेसे पाणी घालून गाठी नसतील असे नीट फेटून घ्या. आता यात उडीद डाळीचे बॅटर मिसळा.
  • मिश्रणामध्ये मीठ घालून ते झाकून 6-8 तास उबदार ठिकाणी आंबायला ठेवा. आंबलेले पीठ थोडे वर येते व हलके दिसते.
  • इडली प्लेटला हलकेसे तेल लावा. त्यामुळे इडली चिकटत नाही.
  • इडलीच्या मोल्डमध्ये पीठ ओता आणि 10–12 मिनिटे मध्यम वाफेवर शिजवा. झाकण उघडण्यापूर्वी 2 मिनिटे दमू द्या.
  • इडली थोडी थंड होऊ द्या आणि चमच्याने अलगद काढा. गरम रागी इडली नारळाची चटणी, सांबार किंवा टोमॅटो चटणी सोबत सर्व्ह करा.
  • पीठ हलके, फेसाळ आणि पातळसर नसावे मध्यम घट्ट ठेवा.
  • आंबण्यासाठी गरम जागा नसेल तर ओव्हन लाईट ऑन करून ठेवू शकता.
  • नाचणी इडली अधिक मऊ हवी असेल तर बॅटरमध्ये 1 चमचा मेथी दाण्याची पेस्ट घालू शकता.

Web Title: Ragi idli recipe make your morning breakfast not only tasty but also healthy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • Breakfast Dishes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
3

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’
4

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.