Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा

Masala Bhendi Recipe : भेंडीची ती चिकट भाजी नव्हे तर एकदा झणझणीत चवीने भरलेली 'मसाला भेंडी' चाखून पहा. रात्रीच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी ही भाजी एक परफेक्ट पर्याय ठरते कारण ती फार कमी वेळेत बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2026 | 03:30 PM
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा 'मसाला भेंडी' बनवून पहा

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा 'मसाला भेंडी' बनवून पहा

Follow Us
Follow Us:
  • भेंडीच्या भाजीत फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आढळून येतो.
  • भेंडीची चिकट भाजी अनेकांना खायला फारशी आवडत नाही.
  • पण आम्ही सांगतो की, तुम्ही एकदा तरी मसाला भेंडीची चव चाखायला हवी.
महाराष्ट्रीयन स्वयंपाकात भेंडीला खास स्थान आहे. भेंडी ही भाजी केवळ चवीला उत्तमच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. अनेकांना भेंडी चिकट होते म्हणून ती आवडत नाही, पण योग्य पद्धतीने आणि मसाल्यांच्या संतुलित वापराने बनवलेली मसाला भेंडी अगदी खमंग, कोरडी आणि तोंडाला पाणी आणणारी लागते.

बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

घरच्या रोजच्या जेवणात भाजी साधी असली तरी चवदार हवी, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. अशा वेळी मसाला भेंडी हा उत्तम पर्याय ठरतो. गरम गरम भाकरी, चपाती किंवा वरण-भातासोबत ही भाजी फारच छान लागते. विशेष म्हणजे ही भाजी कमी तेलातही चविष्ट बनते आणि झटपट तयार होते. पाहुण्यांसाठी किंवा डब्यासाठीही मसाला भेंडी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग, घरच्या घरी खमंग आणि चवदार मसाला भेंडी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य

  • भेंडी – २५० ग्रॅम
  • तेल – ३ टेबलस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • जिरे – ½ टीस्पून
  • कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून (चवीनुसार)
  • धणे-जिरे पूड – १ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर
Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून

 कृती

  • सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून मध्यम आकारात चिरून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घालून तडतडू द्या.
  • त्यात चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता.
  • आता हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घालून मसाला मंद आचेवर परता.
  • चिरलेली भेंडी घालून सर्व मसाल्यात नीट परतून घ्या.
  • झाकण न ठेवता मध्यम आचेवर भेंडी शिजू द्या, मध्येच हलवत राहा.
  • शेवटी मीठ, गरम मसाला आणि आमचूर पावडर घालून २ मिनिटे परता.
  • गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाका.
  • गरमागरम मसाला भेंडी चपाती, भाकरी किंवा साध्या वरण-भातासोबत सर्व्ह करा.

Web Title: Rich in antioxidants know how to make masala bhendi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • subji recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.