Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅशन आणि परंपरेचा परफेक्ट संगम! फक्त कपडेच नाही तर Rashmika आणि Vijay च्या लग्नातील दागिन्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष

नुकतेच विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने लग्न केले असून, चाहत्यांना त्यांनी सुखाचा धक्का दिला आहे, त्यांचे राजेशाही लग्नाचा हा थाट लोकांना खूपच आवडला आहे. तसेच त्यांच्या स्टायलिंग आणि दागिन्यांबद्दल आता जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 27, 2026 | 09:09 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • फॅशन आणि परंपरेचा परफेक्ट संगम
  • Rashmika- Vijay च्या लग्नातील दागिन्यांनी वेधलं लक्ष
  • जाणून घ्या स्टायलिंग आणि दागिन्यांबद्दल
 

अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना या दोघेही गुरुवारी उदयपूर येथे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यांची तुलना पौराणिक महाकाव्यांतील प्रसंगांशी करण्यास सुरुवात केली आहे. केवळ जवळचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या खासगी सोहळ्यानंतर नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जे पाहून चाहते चकीत झाले, तसेच त्यांच्या सगळ्या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. रश्मिका पारंपरिक लाल साडी आणि पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांमध्ये दिसली. तर विजयने ऑफ-व्हाईट धोतर, सोन्याचे दागिने आणि लाल शाल परिधान केली होती.

रश्मिकाने परिधान केलेल्या केशरी-लाल छटांच्या साडीवर तिच्या टेंपल ज्वेलरीने तिच्या स्टायलिंगची आणखी शोभा वाढवली होती. दक्षिण भारतीय पारंपरिक दागिन्यांची ही शैली देवी लक्ष्मीचे नक्षीकाम, मोरांची आकृती आणि सुबक फुलांच्या कोरीव कामासाठी ओळखली जाते. तिने जड सोन्याचा चोकर देखील घातला होता, ज्यावर गोलाकार उठावदार पेंडंट होते, आणि त्यासोबत लांब, नाजूक साखळ्यांचे लेअरिंग केले होते. पारंपरिक सोन्याच्या साखळीला जोडलेले झुमके तिने केसांच्या मागील बाजूस अडकवले होते, ज्यामुळे तिचा लूक अधिक देखणा दिसत होता. वधू-वरांनी हैदराबादमधील श्री ज्वेलर्स येथील दागिने परिधान केले होते.

महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

संपूर्ण दागिन्यांमध्ये तिचा राजेशाही थाट खुलून दिसत होता. ती जणू एखाद्या मणिरत्नम यांच्या चित्रपटातून बाहेर पडलेली अभिनेत्री भासत होती. तिने सोन्याच्या बांगड्या आणि कड्यांचा देखील सुंदर संच परिधान केला होता. त्यातील काही दागिने वरपक्षाकडून आले असल्याचे सांगितले जाते, तसेच पारंपरिक लाल बांगड्यांचाही समावेश अभिनेत्रीने केला होता. रश्मिकाने फुलांच्या नक्षीचे हातफूल, छोट्या मण्यांच्या साखळ्यांनी सजलेला आकर्षक कोपरापर्यंतचा कफ, तिची स्टायलिश एंगेजमेंट रिंग आणि पारंपरिक सोन्याच्या अंगठ्यांची मालिका यांसह आपला दागिन्यांचा साज पूर्ण केला.

पण फक्त वधूच नव्हे, तर वराचाही शाही अंदाज

चाहत्यांना रश्मिकाचा लूक अतिशय भव्य वाटला परंतु, विजय देवरकोंडाने परिधान केलेल्या सोन्याच्या दागिन्यांकडे देखील सगळ्यांचे लक्ष वेधले होते. जिथे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नात साधी डायमंड चेन आणि एक ब्रूच निवडतात, तिथे विजयने अंगावरील वरचा भाग उघडा ठेवत उठावदार सर्पाकृती साखळीचा नेकलेस आणि त्यावर लांब टेंपल-स्टाईल हार परिधान केला होता. त्यासोबत जुळते कानातले स्टड्स आणि योद्ध्यासारखा भासणारा सोन्याचा जड कफ त्याने घातला होता. एंगेजमेंट रिंगची झलक दाखवत त्याने आणखी एक सोन्याची अंगठी परिधान केली आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली! अनुश्री झाली टीममधून बाहेर, म्हणाली “मी आता टोळी सोडतेय…”

नेहमीच्या दक्षिण भारतीय वधू-वरांपेक्षा हा साज निश्चितच खास

आपल्या मूळ गावापासून दूर असले तरी या जोडप्याने राजस्थानमध्ये दक्षिण भारतीय पारंपरिक थाट कायम ठेवत खऱ्या अर्थाने राजेशाही अंदाजात विवाह सोहळा पार पडला आहे. दोघांनीही परिधान केलेल्या दागिन्यांमधून संतुलन, परंपरा आणि साधेपणातील ऐश्वर्य यांची सांगड घालणारी एक सुसंगत फॅशन जगासमोर आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा साज त्यांच्या संस्कृतीची गोष्ट, परंपरा आणि शैली दाखवणारा आहे.

Web Title: Rashmika mandanna and vijay deverakondas heritage wedding jewellery has the internet talking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rashmika mandanna
  • Vijay Deverkonda

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा
4

Mysaa Teaser: रश्मिका मंदानाचा रफ-टफ अवतार पाहून व्हाल थक्क! वडील-मुलीच्या नात्याची अनोखी कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.