'या' आजारांमुळे स्तनांचा आकार होतो लहान
शरीराच्या निरोगी आरोग्यावर स्तनांचा आकार अवलंबून असतो. काही महिलांच्या स्तनांचा आकार फुगीर असतो तर काहींचं लहान असतो. अनेक महिलांसाठी स्तनांचा आकार हे त्यांचे सौंदर्य नसते तर आत्मविश्वास आहे. सुंदर आणि चारचौघांमध्ये उठून दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. पण स्तनांचा आकार आपल्या आवडीवर अवलंबून नसून शरीराच्या निरोगी आरोग्यावर अवलंबून असतो. पौष्टिक आहार, योग्य जीवनशैली, निरोगी शारीरिक आणि मानसिक आरोग्य,शरीराला आवश्यक असलेली झोप इत्यादी गोष्टी स्तनांच्या आकारावर सकारात्मक परिणाम करतात.पण कमी महिलांच्या स्तनांचा आकार खूप लहान असतो. लहान स्तन असलेल्या महिला नेहमी चिंतेमध्ये असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या आजारांमुळे महिलांच्या स्तनांचा आकार लहान होतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: फुफ्फुसात अडकलेला कफ त्वरीत येईल बाहेर, या काढ्याने करा गुळण्या मिळेल झटकन आराम
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा स्त्रियांमधील हार्मोन्समुळे होणारा आजार आहे. पीसीओस मुळे शरीरातील पुरुष हार्मोन्स वाढू लागतात. ज्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शारीरिक विकासावर परिणाम झाल्यानंतर स्तनांवर फॅटी टिशूची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे स्तनांचा आकार लहान राहतो. या आजाराची शरीरात कोणतीही लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
स्त्रियांमध्ये टर्नर सिंड्रोम हा अनुवांशिक आजार आहे. या आजारामध्ये एक एक्स-क्रोमोसोमची अनुपस्थिती असते, ज्यामुळे हार्मोन्सचा अभाव शरीरात निर्माण होतो आणि शारीरिक विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. या आजारामुळे महिलांच्या स्तनांचा आकार लहान राहू शकतो. या आजारावर योग्य वेळी हार्मोनल थेरपी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे हळूहळू शरीराचा विकार होण्यास सुरुवात होते.
‘या’ आजारांमुळे स्तनांचा आकार होतो लहान
सर्वच स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड. थायरॉइड झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये असणाऱ्या थायरॉइड हार्मोनच्या पेशींची कमतरता निर्माण झाल्यामुळे स्तनांचा विकास थांबतो. यामुळे महिलांच्या स्तनांचा आकार लहान राहण्याची शक्यता असते. त्यामुळे थायरॉइड असणाऱ्या महिलांनी प्रत्येक महिन्याला थायरॉइड तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा: शरीरातील घाण खेचून बाहेर फेकेल ही स्वस्त वस्तू
शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर टीबी, HIV आजार होण्याची शक्यता असते. टीबी, HIV या गंभीर आजारांमुळे शरीरातील फॅटी टिशू कमी होऊन जातात. ज्यामुळे स्तनांचा आकार लहान होऊ शकतो. गंभीर आजार झाल्यानंतर शरीराचा विकास थांबतो आणि शरीराचे कार्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे या आजारांची लक्षणे दिसू लागल्यानंतर योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.