सर्दी खोकल्यावरील घरगुती उपाय
हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे शरीर संक्रमित आजारांना सहज बळी पडते. या ऋतूमध्ये सर्दी-खोकला होणे हे अत्यंत सामान्य आहे. अशा स्थितीत वारंवार शिंका येणे, घसा खवखवणे, खोकला आणि फुफ्फुसात कफ जमा होतो. त्यामुळे फुफ्फुसे घट्ट होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत अनेकदा डॉक्टरांनी दिलेली औषधेही कामी येत नाहीत.
पण आम्ही तुम्हाला इथे एक काढ्याची रेसिपी देत आहोत ज्याने तुम्ही गुळण्या केल्यास फुफ्फुसातील जमा झालेला कफदेखील बाहेर पडण्यास मदत मिळते. तुमच्या घशात आणि फुफ्फुसात जमा झालेल्या कफपासून आराम मिळू शकतो. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. कसा होईल फायदा आणि कसा वापर करावा आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
पिंपळीचे पाणी
पिंपळीच्या पाण्याने करा गुळण्या
हे पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला आले, मिरपूड, सैंधव मीठ आणि पिंपळी आवश्यक आहे. या सर्व गोष्टी पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून घ्याव्या आणि त्यानंतर या पाण्याने तुम्ही गुळण्या कराव्या. यामुळे कफ आणि घसा खवखवणे या दोन्हीपासून आराम मिळतो. या पाण्याने आठवडाभर तुम्ही गुळण्या केल्यास तुम्हाला योग्य परिणाम दिसून येईल. हे पाणी तुम्ही पिऊ नका. पिंपळीमधील अनेक पोषक तत्वामुळे घशातील जंतू मरून साठलेला कफ बाहेर येण्यास मदत मिळते. तुम्हाला अनेक दिवस कफ असेल तरीही तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.
हेदेखील वाचा – Tulsi Vivah: 100 आजारांवर एकमेव रामबाण उपाय आहे तुळस, कोलेस्ट्रॉलचा करेल खात्मा
आल्याचा चहा
आल्याचा चहा सर्दी आणि खोकला या दोन्ही समस्या दूर करू शकतो. वास्तविक, यात नैसर्गिक अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे घसा खवखवणे आणि खोकला बरा करण्यास मदत करतात. याशिवाय, घशातील सूज कमी करण्यासाठी आणि जमलेला कफ बाहेर काढण्यासाठी देखील हा आल्याचा चहा उपयुक्त आहे.
कसा बनवाल आल्याचा चहा
आल्याचा चहा पिऊन करा सर्दी आणि खोकल्यावर उपाय
आल्याचा चहा बनविण्यासाठी तुम्ही चहा पावडर, आलं किसून घ्या, पाणी आणि थोडीशी साखर, दूध घ्या. नियमित चहाप्रमाणे तुम्ही हा चहा बनवू शकता आणि काढा स्वरूपात बनविण्यासाठी तुम्ही पाणी गरम करा. त्यात आल्याचे तुकडे, तुळस मिक्स करा आणि उकळवा. त्यानंतर या पाण्याने तुम्ही गुळण्या करा अथवा हा काढा तुम्ही पिण्यानेही घशाची सूज जाईल आणि कफ त्वरीत बाहेर निघण्यास मदत मिळते.
या दोन उपायांनी तुमचे सर्दीने बंद झालेले नाक देखील साफ करता येते. त्यामुळे आतापासून जेव्हाही तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होईल तेव्हा तुम्ही हे करून पाहू शकता. हे दोन्ही सोपे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच सर्दी खोकल्याच्या त्रासातून मुक्तता मिळवून देतील.
हेदेखील वाचा – हिवाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन