सकाळी उठून ६ वाजता चालण्याचे फायदे
शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योगा किंवा मेडिटेशन करणे फार गरजेचे आहे. पण अनेकदा कामाच्या धावपळीमधून व्यायाम करण्यास किंवा आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्य हळूहळू बिघडू लागते. बिघडलेले आरोग्य पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे काम करत आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमधून थोडासा वेळ काढून नियमित चालायला जाणे फार गरजेचे आहे. 666 हा चालण्याचा नियम वापरून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. सकाळी 6 वाजता उठून 60 मिनिटं नियमित चालल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या आणि आजार दूर होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
सकाळी 6 वाजता चालायला गेल्यामुळे अनेक आजारांपासून शरीर निरोगी राहते. कोणतेही आजार होत नाही. तसेच दिवसभराच्या कामातून 30 मिनिटं नियमित चालल्यास हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीराचे रक्तभिसरण सुधारते, पचनक्रिया सुधारते, शुद्ध हवा मिळते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. सकाळी नियमित चालल्यामुळे शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे नियमित चालणे फार गरजेचे आहे.
सकाळी उठल्यानंतर नियमित 6 वाजता चालायला गेल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातील ताण तणाव कमी होण्यास मदत होते आणि थकवा निघून जातो. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित 30 किंवा 60 मिनटं चालावे. कामातून वेळ मिळत नसल्यास तुम्ही संध्याकाळी 6 वाजतासुद्धा चालण्यास जाऊ शकता.
सकाळी उठून ६ वाजता चालण्याचे फायदे
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक महिला पुरुष जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करतात, मात्र तरीसुद्धा वजन कमी होत नाही. पण सकाळी किंवा संध्याकाळी उठून नियमित ६० मिनिटं चालल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. नियमित चालल्यामुळे हृदयाचे आरोग्य, फुफ्फुसाची क्षमता आणि सहनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नियमित चालावे.
सकाळी उठल्यानंतर नियमित 6 मिनिटं वार्म अप करावे, यामुळे शरीराची हालचाल होईल. वार्म अप केल्यामुळे शरीराचे तापमान वातावरणाशी मिळते जुळते होते. त्यामुळे व्यायाम किंवा कोणतेही योगासन करण्याआधी वार्म अप केला जातो. चालायला जाण्याआधी तुम्ही वार्म अप केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. वार्म अपमध्ये तुम्ही स्ट्रचिंग किंवा हलक्या हालचाली करू शकता.