Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक भयानक लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 04, 2026 | 05:30 AM
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे?
कॅन्सर होण्यास कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात?
कॅन्सर होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत?

जगभरात आतड्यांच्या कॅन्सरने अनेक लोक त्रस्त आहेत. कॅन्सर हा अतिशय घातक आणि गंभीर आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे उदभवस्त होऊन जाते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आतड्यांचा कॅन्सर होण्यामागे जीवनशैलीतील सवयी कारणीभूत ठरतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, वारंवार अपचन, अतिप्रक्रिया केलेले अन्न आणि प्रदूषणाचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय लाल मासांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर मोठ्या आतड्याच्या आतील अस्तरावर पेशींचा एक छोटा समूह वाढू लागतो. यामुळे सुरुवातीच्या काळात अपचनाच्या समस्या उद्भवतात. मात्र कालांतराने या समस्या आणखीनच वाढून शरीरासाठी जीवघेण्या ठरतात. जाणून घ्या आतड्यांच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे.(फोटो सौजन्य – istock)

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

तरुणांमध्ये आतड्याचा कर्करोग वाढण्याची कारणे:

जीवघेण्या आजारांची लागण होण्यास वयाचे बंधन अजिबात राहिलेले नाही. मागील काही वर्षांमध्ये ५० पेक्षा कमी व्यायोगटातील लोकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बदललेली जीवनशैली आणि आहारात फायबरची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जंक फूड, तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन करतात. वारंवार मैदा असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढण्यासोबतच अपचनाच्या समस्या सुद्धा वाढू लागतात. त्यामुळे तरुण पिढी गंभीर आजारांच्या जाळ्यात अडकून पडली आहे.

आनुवंशिकता आणि कौटुंबिक इतिहास:

मोठ्या आतड्यांचा कॅन्सर होण्यामागे अनुवांशिकता कारणीभूत ठरते. ‘लिंच सिंड्रोम’ किंवा ‘गार्डनर्स सिंड्रोम’ यांसारख्या बदलांमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. हे आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. कुटुंबात कोणालाही कोलन कॅन्सरचा इतिहास असेल तर कमी वयात गंभीर आजारांची तपासणी करणे आवश्यक आहे.

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे:

  • आतड्यांच्या सवयींमध्ये बदल होणे.
  • अचानक वजन कमी होणे
  • वारंवार बद्धकोष्ठता आणि अतिसार
  • हिमोग्लोबिनची पातळी अचानक घटणे
  • पोटात वारंवार वेदना होणे
  • मलमधून रक्ताचे डाग येणे, इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागल्यास योग्य वेळी उपचार करावेत.
चवदार म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन

उपचार आणि आहारातील खबरदारी:

कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लागण होऊ नये म्हणून आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळ भाज्यांचे सेवन करावे. यासोबतच शरीरास सहज पचन होतील असेच पदार्थ खावेत. आहारात कोंडा न काढलेली पिठे, पॉलिश न केलेला तांदूळ, भरपूर सलाड आणि पालेभाज्यांचा समावेश केल्यास तुम्ही कायमच निरोगी राहाल. आहारात तेलकट आणि अतितिखट पदार्थ अजिबात खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलन कॅन्सर म्हणजे काय?

    Ans: कर्करोग मोठ्या आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या पेशींमध्ये सुरू होतो.

  • Que: कर्करोगाची सामान्य लक्षणे?

    Ans: अचानक वजन घटणे. शरीरात कुठेही नवीन गाठ किंवा जखम होणे, जी बरी होत नाही.

  • Que: कर्करोग टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: धूम्रपान आणि मद्यपान कर्करोगाचे मोठे कारण आहे.

Web Title: These are the serious symptoms that appear in the body after being affected by intestinal cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • cancer
  • cancer risks
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
1

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

पालकांनो दुर्लक्ष करू नका! वारंवार ताप, वजन घटतंय?, मुलांमधील कॅन्सरची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणं
2

पालकांनो दुर्लक्ष करू नका! वारंवार ताप, वजन घटतंय?, मुलांमधील कॅन्सरची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणं

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर
3

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका
4

काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.