हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:
चुकीचा आहार, जंक फूडचे सेवन, शारीरिक हालचालींची कमतरता, व्यायामाचा अभाव, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी, पोटावर वाढलेला चरबीचा घेर आणि लठ्ठपणा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो. वाढलेले वजन कमी न केल्यास मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना योग्य आहार, शारीरिक हालचाली आणि व्यायामाची मदत घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
अनेक महिलांसह पुरुष देखील वजन कमी करण्यासाठी आहारतज्ञांच्या मदतीने डाएट घेतात. मात्र काहीवेळा चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीराचे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची शक्यता असते. तर काही लोक वजन कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. मात्र असे केल्यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे कसे सेवन करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. हळदीच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल आणि इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. हळदीचे पाणी विषाणू आणि बॅक्टेरियापासून शरीराचे रक्षण करण्यास मदत करते. रोगांचा धोका कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. यकृतामधील पित्ताचे प्रमाण वाढून शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हळदीचे पाणी अतिशय प्रभावी ठरते. गॅस, पोट फुगणे किंवा पोटासंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.
उन्हाळाच्या दिवसांमध्ये शरीरात्र जळजळ वाढते. शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. हळदीचे पाणी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. शरीरामध्ये वाढलेल्या चरबीच्या पेशी कमी करण्यासाठी हळदीचे पाणी प्यावे.
हळदीचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात कोमट पाणी बनवून त्यात हळद टाका. नंतर त्यात मध आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होईल. महिनाभर नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होईल आणि आरोग्यसुद्धा अनेक फायदे होतील.