सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' फळांचे सेवन
शरीराचे वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. वजन वाढल्यानंतर शरीरावर अतिरिक्त चरबी वाढून शरीराची रचना बदलून जाते. याशिवाय कोणत्याही प्रकारचे कपडे घालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वजन वाढल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात अनेक नकारात्मक बदल दिसून येतात. वजन वाढू लागल्यानंतर पोटावर चरबीचा अनावश्यक थर जमा होऊ लागतो. यामुळे पोट आणि शरीराचे इतर अवयव विचित्र दिसू लागतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक महिलांसह पुरुष देखील आहारात प्रोटीनशेकचे सेवन करतात. मात्र कोणत्याही प्रोटीनशेकचे आहारात सेवन केल्यामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात बदल करून वाढलेले वजन कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यामुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या सुद्धा दूर होतील.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगड खाल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि आरोग्य सुधारू लागते. वजन कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर कलिंगड खावा. यामुळे पोटावर वाढलेली चरबी लवकर जळून जाईल आणि पोट स्लिम होण्यास मदत होईल. या फळामध्ये ९९ टक्के पाणी आढळून येते. कलिंगड खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित कलिंगड खावे.
रोज सकाळी उठल्यानंतर पपई खावी. पपई खाल्यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पपईचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि कमी कॅलरीज वजन कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेले पेपन एन्झाइम शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी पपई खावी.
विटामिन सी युक्त अननसाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये ब्रॉमिलेन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आवश्यक घटक शरीराला मिळतात. अननस मध्ये असलेले विटामिन सी त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. अननस खाल्यामुळे वजन कमी होणे, पोट सुटणे इत्यादी समस्या दूर होतात.
किमतीने महाग असलेले सफरचंद शरीरासाठी आवश्यक ठरतात. नियमित एक सफरचंद खाल्यास कधीच डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यक भासणार नाही. सफरचंद खाल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यासोबत शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराला आवश्यक घटक मिळतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.