रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर काकडीपासून तयार केलेली हायड्रेटिंग क्रीम
कडक उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घेतली जाते. कारण या दिवसांमध्ये वाढत्या ऊन्हामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. चेहऱ्यावर काळे डाग पडणे, त्वचा टॅन होणे, पिंपल्स, फोड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. उन्हाळा वाढल्यानंतर बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो. याशिवाय शरीरालासुद्धा अनेक फायदे होतात. काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. ज्यामुळे खराब झालेली त्वचा आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा आणि केस खराब होऊन जातात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात बदल करून थंड पदार्थांचे जास्त सेवन केले जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा मुरूम येऊ लागतात. हे मुरूम लवकर निघून जात नाहीत. मुरूम आल्यानंतर मुरुमांचे डाग त्वचेवर तसेच राहतात. हे डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.
काकडीमध्ये असलेले गुणधर्म शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. याशिवाय चेहऱ्यावर आलेले मुरूम आणि इतर समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी काकडीचे सेवन करावे. यासोबतच काकडी डोळ्यांवर किंवा चेहऱ्यावर ठेवावी. आज आम्ही तुम्हाला काकडीपासून हायड्रेटिंग क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रात्री झोपण्याआधी तयार केलेली क्रीम त्वचेवर लावल्यास चेहरा अधिक उठावदार आणि सुंदर दिसेल. याशिवाय काकडीची क्रीम चेहऱ्यावर लावल्यास डार्क सर्कल- पिग्मेंटेशनची समस्या पूर्णपणे दूर होईल.
काकडीची क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी किसून त्यातील रस काढून घ्या. त्यानंतर काचेच्या वाटीमध्ये शिया बटर घेऊन वितळवून घ्या. काकडीच्या रसाचे दोन भाग करून त्यात कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, नारळाचे तेल, गुलाब जल आणि वितळवलेले शिया बटर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण फेटून घेतल्यानंतर क्रीम तयार होईल. काकडीची क्रीम रात्री झोपण्याच्या आधी त्वचेवर लावून घ्यावी. यामुळे चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन आणि इतर समस्या दूर होतील.