
photo- yandex
कोणतेही नाते फक्त प्रेमावर टिकत नाही, तर विश्वास, संवाद, आदर आणि भावनिक जवळीक यावरही ते मजबूत राहते. मात्र अनेकदा नात्यात काही छोटे बदल हळूहळू मोठ्या समस्येचे रूप घेतात. सुरुवातीला दुर्लक्षित वाटणाऱ्या काही सवयी आणि वागणूक पुढे जाऊन रिलेशनशिप तुटण्याचे कारण ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, नाते कमकुवत होण्यापूर्वी काही स्पष्ट संकेत दिसू लागतात, ज्यांना ‘रेड फ्लॅग्स’ म्हटले जाते. हे संकेत वेळेत ओळखले तर नाते वाचवणे शक्य होऊ शकते.
Vitamin B12: सतत थकवा जाणवतोय? असू शकतं Vitamin B12 च्या कमतरतेचे संकेत; जाणून घ्या लक्षणे
कोणत्याही नात्याचा पाया संवादावर उभा असतो. जर पार्टनर अचानक कमी बोलू लागला, मेसेज किंवा कॉलला उशिरा उत्तर देऊ लागला, तर हे नात्यात अंतर वाढत असल्याचे संकेत असू शकतात. अनेकदा लोक एकाच घरात राहूनही भावनिकदृष्ट्या दूर जातात.
लहानसहान गोष्टींवरून सतत रागावणे किंवा पार्टनरचा अपमान करणे हे नात्यासाठी धोकादायक ठरू शकते. भांडणे प्रत्येक नात्यात होतात, पण प्रत्येक वेळी चिडचिड किंवा अपमानजनक वागल्यास ते टॉक्सिक रिलेशनशिपचे लक्षण मानले जाते.
विश्वास हे नात्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर पार्टनर वारंवार खोटे बोलत असेल, गोष्टी लपवत असेल किंवा प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देत असेल, तर हे नाते कमकुवत होत असल्याचे संकेत आहेत.
नात्यात भावनिक जवळीक आणि आपुलकी खूप महत्त्वाची असते. जर पार्टनर तुमच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये रस दाखवत नसेल किंवा शारीरिक जवळीक टाळू लागला असेल, तर हे नातं संपण्याच्या दिशेने जात असल्याचे लक्षण असू शकते.
तुम्ही कोणाशी बोलावे, कोणते कपडे घालावे किंवा कुठे जावे हे जर पार्टनर ठरवू लागला, तर हे प्रेम नसून कंट्रोलिंग वागणूक असू शकते. सुरुवातीला काळजी वाटणारी ही गोष्ट पुढे जाऊन मानसिक तणावाचे कारण बनू शकते.
तज्ज्ञांच्या मते, नात्यातील समस्या दुर्लक्षित करण्याऐवजी त्यावर मोकळेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे. एकमेकांना वेळ देणे, भावना समजून घेणे आणि आदर कायम ठेवणे यामुळे नाते मजबूत होऊ शकते. मात्र, सतत मानसिक त्रास, अपमान किंवा टॉक्सिक वातावरण निर्माण होत असेल, तर योग्य निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
Thyroid: थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी