Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moisturizers लावून सुद्धा त्वचा कोरडी पडते? जाणून घ्या मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक घरगुती, आयुर्वेदिक उपाय करतो. तसेच बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स देखील लावल्या जातात. या क्रीम्सचा जास्त काळ प्रभाव चेहऱ्यावर टिकून राहत नाही. डेली स्किन केअर रुटीनमध्ये चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2024 | 05:02 PM
मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत

मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक घरगुती, आयुर्वेदिक उपाय करतो. तसेच बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स देखील लावल्या जातात. या क्रीम्सचा जास्त काळ प्रभाव चेहऱ्यावर टिकून राहत नाही. डेली स्किन केअर रुटीनमध्ये चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावले जाते. चेहरा स्वच्छ केल्यानंतर सीरम लावून त्यावर मॉइश्चरायझर लावले जाते. यामुळे कोरडी झालेली त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते.

मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरचे तेल त्वचेवर कायम टिकून राहते. त्वचेत ओलावा असल्याने चेहरा कोरडा पडत नाही. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा मऊ होण्यासाठी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावले जाते.स्किन केअर रुटीनमध्ये वर्षाच्या बाराही महिने मॉइश्चरायझर वापर करावा. अनेक महिला पावसाळ्यात त्वचा तेलकट किंवा चिकट होते म्हणून मॉइश्चरायझर लावणे टाळतात. पण असे केल्याने त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेवरील तेज कायम टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत सांगणार्त आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत

मॉइश्चरायझर लावून सुद्धा त्वचा कोरडी का पडते?

  • चुकीच्या पद्धतीने चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा कोरडी पडण्यास सुरुवात होते. त्वचा कोरडी झाल्यानंतर चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात.
  • त्वचेला सूट न होणारे मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा कोरडी पडून जाते.
  • त्वचेमध्ये असलेला नैसर्गिक ओलावा निघून गेल्यानंतर त्वचा हळूहळू कोरडी होण्यास सुरुवात होते.
  • अतिप्रमाणात मॉइश्चरायझरचा वापर केल्याने त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मॉइश्चरायझर लावताना कमी प्रमाणात वापरावे.
  • साबण किंवा फेसवॉशने वारंवार चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्यातील तेल निघून जाते. त्यामुळे स्किन केअर रुटीनमध्ये साबणाचा वापर करू नये.

मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत

मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत:

  • बाहेरून जाऊन आल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करून घ्यावा.
  • टॉवेलच्या सहाय्याने चेहरा कोरडा केल्यास त्वचेवर रॅश किंवा लालसरपणा जाणवत नाही.
  • त्यानंतर बोटांच्या टोकांवर मॉइश्चरायझर लावून ते संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावावे. जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर घेऊन नये.
  • मॉइश्चरायझर लावताना बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. मॉइश्चरायझर लावताना जास्त चेहरा घासू नये.
  • कपाळ, गाल, नाक आणि हनुवटीच्या इथे मॉइश्चरायझर लावून बोटांच्या सहाय्याने टॉप करून लावा. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.
  • त्वचेला सूट होईल असेच मॉइश्चरायझर लावले पाहिजे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर चेहऱ्यावर सनस्क्रीन लावा.
 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Right way to apply moisturizer skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 05:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.