Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi: उत्सवकाळात श्वसन संसर्ग वाढण्याचा धोका, प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

उत्सवादरम्यान बरेचदा आरोग्य बिघडते आणि आनंद घेताना तब्बेतीकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बरेचदा या काळात श्वसनाचा त्रास अधिक होतो, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 03, 2025 | 11:16 AM
श्वसनाचा विकार असल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

श्वसनाचा विकार असल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्सवादरम्यान वाढते विकार
  • श्वसनाचा विकार का वाढतोय
  • श्वसनाच्या विकारासाठी काय करावे

राज्यभरात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान आपले आरोग्य चांगले रहावे याकरिता प्रत्येकाने आवश्यक ती सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. श्वसन संसर्ग दूर ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करा. प्रत्येकाने उत्सवाचा आनंद घेत असताना आपल्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.

गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि एकत्र येऊन साजरा सण आहे, जो सर्व वयोगटातील व्यक्ती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शिवाय आपल्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला आणि समाजाला एकत्र आणतो. सार्वजनिक गणेशोत्सवात दर्शनासाठी झालेली आणि त्या गर्दीत खोकणे, शिंकणे आणि अगदी बोलणे याद्वारे देखील विषाणू आणि बॅक्टेरिया चा प्रसार होतो. या सणाच्या काळात मुलं, वयोवृद्ध महिला, गर्भवती महिला आणि दमा किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती असुरक्षित असतात यामुळे सावधगिरी बाळगणे अधिक गरजेचे आहे.

काय सांगतात तज्ज्ञ

एम्स हॉस्पिटल डोंबिवलीचे जनरल फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कुशल बांगर सांगतात की, सणासुदीचा काळ हा संसर्ग वाढीस कारणीभूत ठरु शकतो. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असल्याने सर्दी, फ्लू आणि घशाच्या संसर्गासारख्या श्वसन संसर्गांमध्ये चिंताजनक वाढ होऊ शकते. प्रत्येकाने सतर्क राहावे आणि सतत खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. निरोगी राहण्यासाठी आणि श्वसन संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे आणि हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. आपले आरोग्य जपून हा सण भक्तीने साजरा करण्याचा प्रयत्न करा.

पावसाळ्यातील श्वसन संसर्ग टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

सामान्य लक्षणे कोणती?

डॉ. अहमद खान, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, मधुमेह विकार तज्ज्ञ आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी सांगितले की, श्वसन संसर्गाची सामान्य लक्षणे म्हणजे खोकला आणि घसा खवखवणे, वाहणारे किंवा चोंदलेले नाक, ताप आणि अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, छातीत घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळून येतात.अशी लक्षणे आढळतात विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या कळवा आणि वेळीच व्यवस्थापन करा.

काय करावे 

  • पालकांनी आपल्या मुलांना हात धुण्याचे योग्य तंत्र शिकवा, गर्दीच्या जागी विशेषतः सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी मास्क वापरण्यास प्रोत्साहित करा. गर्दीच्या ठिकाणी मुलाला घेऊन जाणे टाळणे योग्य राहिल किंवा गर्दी नसताना सकाळी लवकर बाप्पाच्या दर्शन घ्या
  • थोरामोठ्यांनी देखील गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा,सोबत हँड सॅनिटायझर बाळगा आणि भरपूर पाणी प्या. दमा, ब्राँकायटिस किंवा अ‍ॅलर्जी असलेल्यांनी इनहेलर किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे जवळ ठेवा. खूपच गर्दी असेल तर अशा ठिकाणी दुरुन दर्शन किंवा ॲानलाईन दर्शनाचा लाभ घ्या
  • घरातील वयस्कर व्यक्तींनी कमी गर्दीच्या वेळी दर्शनास जाणे किंवा ऑनलाइन माध्यमाद्वारे वापर करणे योग्य राहिल. वेळोवेळी लसीकरण (फ्लू आणि न्यूमोनिया) आणि सर्दी किंवा खोकला असलेल्या लोकांच्या संपर्कात येणे टाळा. 
  • शिंकताना आणि खोकताना तोंड झाका. ताजे, घरी शिजवलेले अन्नपदार्थांचे सेवन करा, भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली झोप घ्या. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करणे टाळा 
  • दम लागणे आणि खुप थकवा जाणवणे यासारख्या लक्षणांसाठी त्वरीत वैद्यकिय मदत घ्या. या टिप्सचे पालन करून, गणेशोत्सवाचा आनंद घेणे आणि श्वसन संक्रमण टाळणे शक्य आहे

लहान मुलांमध्ये वाढतोय हृदयविकार; जाणून घ्या लक्षणे, त्यावरील उपाय

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Risk of respiratory infections increases during festive season experts advise to follow preventive measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2025
  • Health Tips

संबंधित बातम्या

पुण्याच्या अंतःकरणात लपलेलं आहे ‘हे’ गणपती मंदिर; जाणून घ्या भक्तांसाठी का आहे खास आणि विलक्षण?
1

पुण्याच्या अंतःकरणात लपलेलं आहे ‘हे’ गणपती मंदिर; जाणून घ्या भक्तांसाठी का आहे खास आणि विलक्षण?

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या आवडीचे मोदक पण थोड्या हटके अंदाजात, घरी बनवा सुगंधित अन् चवदार Rose Coconut Modak
2

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या आवडीचे मोदक पण थोड्या हटके अंदाजात, घरी बनवा सुगंधित अन् चवदार Rose Coconut Modak

३००० फूट उंचीवर खुल्या आकाशाखाली विराजमान आहे ‘एकदंत गणपती’, हजारो वर्षांचा इतिहास आणि इथे जायचं कसं ते जाणू
3

३००० फूट उंचीवर खुल्या आकाशाखाली विराजमान आहे ‘एकदंत गणपती’, हजारो वर्षांचा इतिहास आणि इथे जायचं कसं ते जाणू

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन
4

Thane News : पुढच्या वर्षी लवकर या…! आज 49 हजार गौरी गणपतींचे विसर्जन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.