सडलेले लिव्हर होईल आतून स्वच्छ! उपाशी पोटी हळदीसोबत करा 'या' पदार्थाचे सेवन
दैनंदिन आहारातील खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, मद्यपान, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या सवयींमुळे शरीराला हानी पोहचते. हल्ली अनेकांमध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी जमा होते. यामुळे लिव्हरला सूज येणे, डोळे पिवळे दिसू लागणे, पोटात वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. लिव्हर खराब झालेल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. यामुळे आरोग्याला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी, दैनंदिन आहारात चुकूनही करू नका सेवन
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या, टॉनिक किंवा डिटॉक्स पेय आली आहेत. मात्र हानिकारक रसायनाचा वापर करून बनवलेले डिटॉक्स पेय सेवन केल्यास शरीराला आणखीनच हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला लिव्हर स्वच्छ करण्यासाठी उपाशी पोटी हळदीमध्ये कोणता पदार्थ मिक्स करून खावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. लिव्हरमध्ये साचलेल्या घाणीमुळे आरोग्याला हानी पोहचते.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले घटक जेवणातील पदार्थांची चव आणि रंग वाढवण्यास मदत करतात. याशिवाय हळदीमध्ये असलेले करक्यूमिन शरीरासाठी अतिशय घटक आढळून येतात. हळदीचे सेवन केल्यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. लिव्हर आणि शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी हळदीच्या पाण्याचे किंवा हळदीच्या दुधाचे सेवन केले जाते. हळदीचे सेवन केल्यामुळे लिव्हरला आलेली सूज कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच अन्नपदार्थांमधील फॅट्स सहजपणे डायजेस्ट होण्यास मदत होतात.
जेष्ठ मधाचे सेवन केल्यामुळे लिव्हरमधील उष्णता कमी होण्यास मदत होते. लिव्हरमध्ये साचलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासाठी जेष्ठमध खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच लिव्हरला झालेली जखम भरून काढण्यासाठी जेष्ठमध आणि हळदीचे सेवन करावे. शरीरात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी हळदीचे आणि जेष्ठमधाचे एकत्र सेवन करावे.
आहारात चुकूनही करू नका ‘या’ भाज्यांचे सेवन! मूळव्याधीचा होईल गंभीर आजार, ओढावेल ऑपरेशनची वेळ
लिव्हर स्वच्छ करण्यासाठी वाटीमध्ये हळद आणि जेष्ठमध एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. त्यानंतर तयार केलेले मिश्रण कोमट पाण्यात मिक्स करून सेवन केल्यास लिव्हरमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात आणि लिव्हरमधून साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
यकृताचे रोग होण्याची काही सामान्य कारणे कोणती?
जास्त मद्यपान: जास्त मद्यपान केल्याने यकृताला नुकसान होऊ शकते, ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि सिरोसिस (Cirrhosis) सारखे रोग होऊ शकतात. जेव्हा यकृतामध्ये जास्त चरबी जमा होते, तेव्हा फॅटी लिव्हर होतो. जास्त वजन, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो.
यकृताच्या आजारांची काही लक्षणे कोणती?
यकृताच्या आजारात पोटात दुखणे किंवा सूज येऊ शकते.यकृताचे कार्य कमी झाल्यावर थकवा आण अशक्तपणा जाणवू शकतो. यकृताच्या समस्येमुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होऊ शकते.
यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?
संतुलित आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि फायबर भरपूर प्रमाणात असावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावे. नियमित व्यायाम करावा.