स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांमुळे शरीराला पोहचते हानी
दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी आरोग्यासाठी कायमच व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य दिनचर्या फॉलो करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात खाल्ले जाणारे पदार्थ आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. पण बऱ्याचदा आहारात थंड, तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. तसेच स्वयंपाक घरात वापरली जाणारी साधने किंवा भांड्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे जेवण करताना चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा स्वयंपाक घरातील भांड्यांमुळे जेवण बनवताना अन्नपदार्थांमध्ये विषारी तत्व शरीरात जातात. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा नियमित वापर केल्यामुळे शरीरात विषारी तत्व तयार होतात? आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
फक्त चहा-कॉफीच नाही, ‘या’ रोजच्या आहारातील गोष्टी सुद्धा उडवतील तुमची झोप
प्रत्येक स्वयंपाक घरात असंख्य प्लास्टिकच्या वस्तू असतात. प्लास्टिकच्या वस्तूमध्ये डबे, बाटल्या, ताट इत्यादी अनेक वस्तूंचा वापर केला जातो. घरात असलेले प्लास्टिकचे चमचे किंवा वस्तू गरम तापमानात वारंवार राहिल्यामुळे झिजून जातात. ज्यामुळे अन्नपदार्थांमध्ये ‘BPA’ सारखी रसायने मिक्स होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक लोकांच्या लघवी चाचणीमध्ये BPA चे प्रमाण ९३% आढळून आले आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात प्लास्टिक वस्तूंचा वापर करण्याऐवजी नलेस स्टील, सिलिकॉन किंवा बांबूचे साधन वापरावीत.
डोसा किंवा फ्राय पदार्थ बनवताना नॉन-स्टिक भांड्यांचा वापर केला जातो. या भांड्याचा वापर केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. नॉन-स्टिक भांड्यांमध्ये PFSA नावाचे रसायन आढळून येते. या रसायनाला ‘फॉरएव्हर केमिकल्स’ असे सुद्धा म्हंटले जाते. शरीरात हानिकारक रसायन दीर्घकाळ साचून राहिल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे जेवणातील पदार्थ बनवताना कायमच स्टेनलेस स्टील, कास्ट आयर्न किंवा पूर्णपणे सिरॅमिक असलेल्या भांड्यांचा वापर करावा.
आहारात चुकूनही करू नका ‘या’ भाज्यांचे सेवन! मूळव्याधीचा होईल गंभीर आजार, ओढावेल ऑपरेशनची वेळ
हल्ली अनेक ठिकाणी जेवण बनवताना मातीच्या भांड्याचा वापर केला जात आहे. मातीच्या भांड्यांमध्ये असलेले घटक शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात. याशिवाय योग्य भांडी आणि साधने वापरल्यास अन्नातील पोषण मूल्य कायम टिकून राहतात. त्यामुळे पचनसंस्था, हृदयाचे आरोग्य आणि हार्मोन संतुलन इत्यादी अनेक गोष्टी निरोगी राहण्यास मदत होते.