आहारात चुकूनही करू नका 'या' भाज्यांचे सेवन!
आरोग्यासंबंधित गंभीर आजार म्हणजे मूळव्याध. मूळव्याध झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. दैनंदिन आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे मूळव्याधीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात तिखट तेलकट खावे. मूळव्याधीची समस्या उद्भवल्यानंतर काहींना शौचाच्या जागी सूज, वेदना, जळजळ तर काहीवेळा रक्त पडण्याची शक्यता असते. वारंवार रक्त पडून शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. मूळव्याध झाल्यानंतर खाली बसल्यानंतर अनेक वेदना होतात. याशिवाय वारंवार होणाऱ्या बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला मूळव्याध झाल्यानंतर आहारात कोणत्या भाज्यांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
मूळव्याध झाल्यानंतर कांद्याचे अजिबात सेवन करू नये. कारण कांद्यामध्ये असलेले घटक शरीरात उष्णता वाढतात. याशिवाय कच्चा कांदा खाल्यामुळे गुदद्वाराजवळील सूज आणि खाज येण्याची जास्त शक्यता असते. काहींना जेवणताना नेहमीच कांदा खाण्याची सवय असते. यामुळे मल अधिक कडक होतो आणि शौचास अनेक अडचणी वाढू लागतात. त्यामुळे तुम्ही आहारात कच्चा कांदा खाण्याऐवजी शिजलेला कांदा खावा.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं वांग्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. वांग्याच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. पण वांग्याचे भरीत अतिशय आवडीने खाल्ले जाते. पण मूळव्याध असलेल्या रुग्णांनी अजिबात वांग खाऊ नये. वांग खाल्यामुळे गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू लागते. वांग खाल्यामुळे शौचास बसताना अधिक वेदना आणि जळजळ वाढू लागते.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोबीची भाजी खायला खूप जास्त आवडते. पण मूळव्याधीच्या रुग्णांसाठी कोबीची भाजी चांगली नाही. या भाजीच्या सेवनामुळे पोटात गॅस तयार होऊन गुदद्वाराच्या नसांवर अधिक दबाव येतो. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर कोबीची भाजी खाऊ नये. कोबीची भाजी योग्य पद्धतीने स्वच्छ करून नंतरच खावी.
हिरव्यागार पालकपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण पालक भाजी मूळव्याधीच्या रुग्णांसाठी चांगली नाही. पालक खाल्यामुळे गॅस, अपचन आणि पोट साफ न होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. तसेच मूळव्याधीच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी पालक व्यवस्थित शिजवूनच खावा. कच्च्या पालकचे अजिबात सेवन करू नये.
मूळव्याध म्हणजे काय?
मूळव्याध, ज्याला बवासीर देखील म्हणतात, ही गुद्द्वार आणि खालच्या गुदाशयातील नसांची सूज आहे. या नसा सामान्य स्थितीत असताना गुद्द्वाराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी असतात. जेव्हा या नसा सुजतात, तेव्हा त्यांना मूळव्याध म्हणतात.
मूळव्याधसाठी घरगुती उपचार काय आहेत?
गरम पाण्यात बसल्याने वेदना आणि सूज कमी होऊ शकते.सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक घ्या.नारळ तेल लावल्याने खाज आणि वेदना कमी होऊ शकतात.