जपानी महिलांच्या सुंदर त्वचेचं रहस्य
सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल करणे, फेस मास्क लावणे, फेसपॅक लावणे इत्यादी अनेक उपाय करून त्वचेचे सौदंर्य वाढतात. पण चेहऱ्याचे सौदंर्य वाढवण्यासाठी शरीराला आतून पोषण देणे गरजेचे आहे. शरीरामध्ये पोषक तत्वांची आणि विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासोबतच चेहऱ्याचे सौदंर्य सुद्धा खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचेचे सौदंर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
निरोगी त्वचेसाठी सर्वच महिला रुटीन फॉलो करतात. स्किन केअरमध्ये चेहऱ्याला सीरम लावणे, मॉइश्चराइज लावणे, सनस्क्रीन लावणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. हल्ली सोशल मीडियावर जपानी महिला कोणते स्किन केअर फॉलो करतात, याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. जपानी महिला त्याच्या सुंदर त्वचेमुळे त्याच्या वयापेक्षा खूप लहान आणि सुंदर दिसतात. त्यामुळे आपल्यासुद्धा त्यांच्यासारखी सुंदर आणि गोरीपान त्वचा हवी असते. ही त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जपानी महिलांच्या सौंदर्याचे रहस्य सांगणार आहोत. हे उपाय तुम्हीसुद्धा नक्की करून बघा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: अशाप्रकारे घरातील प्रत्येक मुलाला शिकवा Good Touch, Bad Touch!
जपानी महिलांच्या सुंदर त्वचेचं रहस्य
जपानी ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरासोबतच त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. ग्रीन टी त्वचेला मॉइश्चरायझ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावर आलेले मुरूम घालवण्यासाठी जपानी टी चा वापर केल्यास चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होऊन त्वचा स्वच्छ होईल. डोळ्यांतील सूज, लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यासाठी ग्रीन टी अतिशय गुणकारी आहे.
त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात फळे आणि ड्रायफ्रूटचे सेवन करावे. किवीमध्ये विविध जीवनसत्त्वे, फोलेट आणि पोटॅशियम, अँटीअँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करता. किवी हे फळ सुपरफ्रुट म्हणून ओळखले जाते. त्वचेमधील ओलावा आणि आद्र्रता टिकवून ठेवण्याचे काम किवी करते. ड्रायफ्रुटमध्ये त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी अक्रोडाचे सेवन करावे.
जपानी महिलांच्या सुंदर त्वचेचं रहस्य
जपानी आणि कोरियन महिला त्वचेच्या सौदंर्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करतात. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेचा रंग सुधारून चेहऱ्यावरील काळेपणा घालवण्यासाठी प्रभावी आहे. तांदळाच्या पेस्टचा वापर तुम्ही चेहऱ्यासह शरीरातील इतर भागांमधील काळेपणा घालवण्यासाठी करू शकता. नियमित तांदळाचे पाणी त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो.
हे देखील वाचा: उन्हामुळे चेहरा काळा पडला आहे? मग टॅनिंग काढण्यासाठी ‘हा’ उपाय नक्की करून पहा
वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करावे. यामुळे त्वचेमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे तुमचा मूड सुधारून तणाव कमी होतो.