टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय
वातावरणामध्ये सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली सगळीकडे कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. वाढते ऊन आणि प्रदूषणाचा फटका त्वचेला बसत असल्यामुळे चेहऱ्यासह संपूर्ण शरीराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सकाळी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर किंवा इतर वेळेस बाहेर गेल्यानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावूनच घराबाहेर जावे. सनस्क्रीनचा वापर न केल्यामुळे चेहऱ्यासह हात आणि पायसुद्धा पूर्णपणे काळे होऊन जातात. त्वचेचे सौदंर्य वाढवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. पण हे उपाय करूनसुद्धा उन्हामुळे चेहरा काळा पडतो.
चेहऱ्यासोबतच हात पायांच्या त्वचेसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा आपण चेहऱ्याच्या त्वचेकडे लक्ष देतो, मात्र हातापायांच्या त्वचेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण असे न करता हातापायांच्या त्वचेकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हामुळे आणि वातावरणातील आद्र्रतेमुळे काळा पडलेला चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी अनेक महिला महागड्या क्रीम,पार्लरच्या ट्रीटमेंट, त्वचा उजळ्वण्यासाठी ब्राइटनिंग क्रीम इत्यादी अनेक गोष्टी लावतात. पण याचा परिणाम फारकाळ चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय
हे देखील वाचा: लॅपटॉप, मोबाईल वापरून डोळे दुखतायत? मग नियमित करा ही योगासने, डोळ्यांच्या त्रासापासून मिळेल सुटका

टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय






