Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप…! संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून प्रार्थना केली जाते. याशिवाय बाप्पाचे नामस्मरण केले जाते. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा दिवस आनंद आणि उत्साहात जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा या भक्तिमय शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2026 | 05:30 AM
संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात सगळ्यात लोकप्रिय आणि प्रथम पूजनीय दैवत म्हणून कायमच गणपती बाप्पाचे नाव घेतले जाते. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता, बुद्धीची देवता आणि शुभकार्याचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकटं दूर होतात आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. तसेच बाप्पाची पूजा जास्वंदीची फुले, दुर्वा अर्पण करून, श्रीगणेश मंत्राचा जप करून केली जाते. त्यामुळे या अत्यंत शुभ दिवशी तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि कुटुंबातील सदस्यांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

June Festival List 2026: जून महिन्यात वटपौर्णिमा आणि निर्जला एकादशी कधी आहे जाणून घ्या सण उत्सवांची यादी

“विघ्नहर्ता श्री गणेश तुमच्या जीवनातील सर्व दुःखे, संकटे आणि विघ्ने दूर करो आणि तुम्हाला सुख, समृद्धी, यश आणि उत्तम आरोग्य लाभो!
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी,
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम…
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!”

“कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!
श्रीगणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना, श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

प्रथम तुला वंदितो गणराया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया
सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया
चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

Web Title: Send devotional wishes to relatives and friends on the occasion of sankashti chaturthi ganpati bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Ganapati Bappa
  • Ganesh Chaturthi news
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
1

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.