Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शील, करूणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा…! डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळे संदेश

शिक्षण, समतेचा अधिकार, आणि सामाजिक न्यायसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीतर दलित समाजातील लोकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून दिले.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 14, 2026 | 05:30 AM
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळे संदेश

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळे संदेश

Follow Us
Follow Us:

दरवर्षी १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेबांनी आपले आयुष्य दलित समाजाच्या जडणघडणीसाठी समर्पित केले. याशिवाय त्यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क दिला. आर्थिक आणि सामाजिक भेदभावाचा सामना करत बाबासाहेबांनी संपूर्ण देशासाठी संविधान लिहिले. शिक्षण, समतेचा अधिकार, आणि सामाजिक न्यायसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीतर दलित समाजातील लोकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून दिले. अजूनही बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे त्यांच्या आठवनींना उजाळा देण्यासाठी हे मराठमोळे संदेश नातेवाईकांना नक्की पाठवा.(फोटो सौजन्य – pinterest)

Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांविषयी सर्व माहिती, जीवन …

ज्ञान, समतेचा आणि न्यायाचा जागर करणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा! आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी लाखो घरांचा उद्धार केला, दीन-दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला, अशा महामानवाला कोटी कोटी अभिवादन!

भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! बाबासाहेबांचे विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील.

निळ्या रक्ताची धमक, स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहे! जय भीम!

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायल्याशिवाय राहणार नाही! शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!

“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!”

“ज्यांच्यामुळे आपण ताठ मानेने जगत आहोत, त्या महामानवाला मानाचा मुजरा!”

“समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या महासूर्याला विनम्र अभिवादन!”

“भीमरावांचा एकच नारा, समतेचा विचार करा!”

समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या
महासूर्याला विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्यामुळे आज आपण ताठ मानेने जगत आहोत,
त्या जगातील सर्वात विद्वान व्यक्तीला,
महामानवाला कोटी कोटी प्रणाम
भीम जयंतीच्या शुभेच्छा!

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
आणि जो ते प्राशन करेल
तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही!
अशा विचारांची प्रेरणा देणाऱ्या
बाबासाहेबांना जयंती निमित्त अभिवादन

अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद ज्यांनी दिली,
त्या क्रांतीसूर्याला मानाचा मुजरा
भीम जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा!

दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

शून्यातून विश्व निर्माण करणारी शक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अशा युगपुरुषाच्या विचारांना आज पुन्हा एकदा स्मरण्याचा दिवस
जय भीम!

तुमच्या विचारांची मशाल कायम तेवत राहील,
समतेचा विचार मनात सदैव राहील
बाबासाहेब जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

विद्वत्तेचे महासागर आणि कोट्यवधींच्या जीवनातील प्रकाश,
बाबासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा!
भीम जयंती निमित्त मंगलमयी शुभेच्छा

जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या
महामानवाला जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम
सर्वांना आंबेडकरी शुभेच्छा!

गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या,
म्हणजे तो बंड करून उठेल
या विद्रोही विचारांच्या जनकाला जयंती निमित्त अभिवादन

निळा झेंडा आणि भीमरायांचा विचार,
हाच आमचा खरा आधार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपणास मन:पूर्वक शुभेच्छा!

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असावेत,
हा संस्कार देणाऱ्या घटनेच्या शिल्पकाराला त्रिवार वंदन

आजचा दिवस आनंदाचा,
आजचा दिवस उत्साहाचा,
कारण आज जन्म झाला
माझ्या भीमरायाचा
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्ञानाचा अथांग सागर
आणि जगातील सर्वात महान संविधान देणाऱ्या
महामानवाला विनम्र अभिवादन
जय भीम, जय भारत!

तुमच्यामुळे आम्हाला आमची ओळख मिळाली,
तुमच्यामुळे आम्हाला आमचे हक्क मिळाले
बाबासाहेब, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

शील, करूणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कोणत्याही समजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ अनमोल विचार जीवन जगताना देतील प्रेरणा …

जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात. स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!

मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Web Title: Send marathi messages to relatives on the occasion of dr babasaheb ambedkar jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
3

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.