मराठी भाषा गौरव दिनाच्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा
27 फेब्रुवारीला राज्यभरात सगळीकडे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या वाढदिवसांनिमित्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. संपूर्ण देशासह जगभरात सगळीकडे मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. आपुलकी वाटणारी आणि जिव्हाळ्याची भाषा म्हणजे मराठी भाषा. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी सगळ्यात पहिली भाषा मराठी आहे. 1999 मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. आज आम्ही तुम्हाला मराठी गौरव भाषा दिनाच्या शुभेच्छा प्रियजनांना पाठवण्यासाठी काही खास संदेश सांगणार आहोत. हे वाचून सगळ्यांचं आनंद होईल.
२७ फेब्रुवारीला का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या इतिहास आणि मराठी भाषेचे महत्व
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईची भाषा अर्थात मातृभाषा असणारी मराठी ही आपला सर्वांचाच अभिमान आहे. मराठी राजभाषा दिनी द्या आप्तेष्टांना शुभेच्छा!
माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना… जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत आमची माय मराठी अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते आमची माय मराठी संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे आमची माय मराठी नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही आमची माय मराठी
रुजवू मराठी भाषा खुलवू मराठी भाषा जगवू मराठी भाषा येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी भाषा गौरव दिन: एक सूर एक ध्यास छेडितो मराठी, एक संघ एक बंध गुंजीतो मराठी
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”