आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवावा भक्तिमय शुभेच्छा
देशभरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केली जाते. पंढरपूरची वारी महाराष्ट्रात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करतात. महाराष्ट्रातील लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी होत विठ्ठल माउलींच्या नामाचा गजरकरत भक्तीमध्ये तालीन होतात. वारीमध्ये वारकरी उन्हाळाच्या झळा, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारांमध्ये वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेतात. हातामध्ये भगवा झेंडा, डोक्यावर तुळस घेत पंढरपूरपर्यंत पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. आज आम्ही तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही भक्तिमय शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचा आनंद वाटेल.(फोटो सौजन्य – istock)
सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला..! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी,
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।।
चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीला विठोबाच्या पावलांचा वारकरीचा सण आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वराची कृपा आशा करतो! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
रंगी रंगला श्रीरंग
मी तुंपन गेले वायां
पाहतां पंढरीच्या राया
भागवत एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
भागवत एकादशीच्या पावन प्रसंगी
आपल्या जीवनात नवीन आनंदाचे
दालन खुले होवो, ही विठ्ठलाकडे प्रार्थना!
भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
भागवत एकादशीच्या निमित्ताने
आपल्या घरात सकारात्मकतेसोबतच
प्रेमाचे वातावरण निर्माण होवो,ही सदिच्छा!
भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा, वारकऱ्यांचा मेळा,
पंढरी निवासा सख्या पांडुरंगा… विटेवर उभा
भागवत एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
विठ्ठलाच्या कृपेने आपल्या जीवनात
सुख-शांती आणि समृद्धी येवो…
भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
या पवित्र एकादशीच्या प्रसंगी
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
अशी विठुरायाकडे मनापासून प्रार्थना!
भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढीभक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले…
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले…
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी
तुझ्या सहवासात राहू दे…
भागवत एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
Ashadhi Ekadashi 2025: देवशयनी एकादशीला करा ‘हा’ तांदळाचा उपाय ; आर्थिक चणचण होईल दूर
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवो निया
भागवत एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा