फोटो सौजन्य: pinterest
Ashadhi Ekadashi 2025:आषाढी एकादशी हा महाराष्ट्रीय भक्तीपरंपरेतील महत्वाचा सण आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून पंढरीच्या राजाला भेटण्यासाठी दरवर्षी वारकरी पायी चालत वारी पूर्ण करतात. धार्मिक पुराणानुसार असं म्हटलं जातं की, भगवान विष्णूंनी पंढरपूरात विठ्ठल अवतार धारण केला आणि युगे अठ्ठावीस विटेवर उभा हा माऊली आपल्या लेकरांच्या कल्य़ाणासाठी कायमच तत्पर असते. या देवशयनी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंची पूजा केल्याने फलप्राप्ती होते. पुराणकथांनुसार असं म्हटलं जातं की, भगवान विष्णू हे धनसंपत्तीची देवता आहे. त्यामुळे देवशयनी एकादशीच्या निमित्ताने विष्णूंची उपासना केल्यास चांगली फलप्राप्ती होते असं सांगितलं जातं.
आषाढात येणाऱ्या एकदशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. याचा अर्थ असा की, या दिवशी भगवान विष्णू क्षिरसागरात निद्रीस्त होतात. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चातुर्मासाचा काळ असतो. त्यामुळे असे काही मुहुर्त असतातात ज्यावेळी काही उपाय केल्याने घरातील आर्थिक चणचण दूर होईल.
तुम्हालाही जर आर्थिक चणचण जाणवत असेल तर तुम्ही देवशयनी एकादशीला शंखाची पूजा करु शकता. देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची उपसना केल्याने फलप्राप्ती होते. एकादशीला तुम्ही तुमच्या ठराविक रितीभातीप्रमाणे पूजा करा. त्याचबरोबर शंखपूजा केल्याने तुम्हाला फलप्राप्ती होऊ शकेल. ज्योतिष अभ्यासक श्वेता यांनी त्यांच्य़ा इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती दिली आहे.
देवपूजा करुन झाल्यावर घरातील शंख घ्या. त्याच्या पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवा. या शंखामध्ये तांदूळ भरा. त्याची पूजा करा. त्यानंतर हा शंख तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेऊन द्या. कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशी. ज्या दिवशी देव निद्रावस्थेतून उठतात त्यादिवशी हे तांदूळ तुम्ही तुमच्या तिजोरीतून बाहेर काढा. त्य़ानंतर हे तुम्ही पक्षांना खाऊ घालू शकता किंवा कुटुंबातील व्यक्तींनी याचं सेवन केलं तरी चालेल. या सगळ्याने तुम्हाला होण्याची आर्थिक समस्या दूर होईल. हा उपाय करताना मात्र मनात विश्वास आणि श्रद्धा हवी. त्याचबरोबर तुम्ही करत असलेलं कर्म देखील योग्य असायला हवं आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)