Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Cancer Day 2026: ओरल कॅन्सरचे उशीरा निदान झाल्यामुळे उद्भवतात गंभीर समस्या, देशात जवळपास ७०-८० टक्‍के रुग्ण

देशभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. त्यामुळे वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 12:55 PM
World Cancer Day 2026: ओरल कॅन्सर उशीरा निदान झाल्यामुळे उद्भवतात गंभीर समस्या, देशात जवळपास ७०-८० टक्‍के रुग्ण

World Cancer Day 2026: ओरल कॅन्सर उशीरा निदान झाल्यामुळे उद्भवतात गंभीर समस्या, देशात जवळपास ७०-८० टक्‍के रुग्ण

Follow Us
Close
Follow Us:

भारतात तोंडाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सर हा दुर्मिळ आजार नाही कारण देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळ-जवळ एक तृतीयांश प्रकरणे या प्रकारात मोडतात; आरोग्याच्या दृष्टीने ही एक मूकपणे बळावणारी आणीबाणीची परिस्थिती आहे, जी स्पष्टपणे दिसत असूनही दुर्लक्षित राहून जात आहे. तपासणीदरम्यान नुसते पाहूनही सहज लक्षात येण्याजोगा आजार असूनही ओरल कॅन्सरच्या जवळ-जवळ ७०-८० टक्‍के प्रकरणांचे निदान तो गंभीर टप्प्यावर (तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर) पोहोचल्यावरच होते, जेव्हा पाच वर्षांच्या पुढे जगण्याच्या शक्यतेचा दर ३० टक्‍क्‍यांच्याही खाली येतो. सुरुवातीच्या टप्प्यावर निदान झालेल्या प्रकरणांमध्ये याच्या बरोब्बर उलट घडताना दिसते, जिथे आजारातून बचावण्याचे प्रमाण ८० टक्‍क्‍यांच्याही पुढे जाते. या आजाराच्या शोकांतिकेचे कारण उशीरा होणाऱ्या निदानामध्ये दडलेले आहे.

रुग्णाला पहिली लक्षणे दिसू लागल्यावर तो कर्करोगावर उपचार करणाऱ्या विशेषीकृत केंद्रावर पोहोचण्यामध्ये सर्वसाधारणपणे तीन ते सहा महिन्यांचा काळ जातो. प्रारंभिक काळात तोंडाच्या आत उमटणारे व्रण हे बहुतेकदा वेदनारहित आणि आकाराने लहान असतात, तसेच त्यांच्याकडे सहजपणे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे एक सहज बरा होऊ शकण्याजोगा आजार तपासणीअभावी पुढच्या टप्प्यावर पोहोचतो.(फोटो सौजन्य – istock)

World Cancer Day 2026: भारतातील Breast Cancer वर 4 उपचारपद्धती, जगण्याची शक्यता वाढवण्यास करतील मदत

हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. सुलतान ए. प्रधान म्हणाले, “स्क्रिनिंग प्रोग्राम्स या आजाराची बाजी पलटवून टाकणारे सिद्ध झाले आहेत. तोंडाच्या तपासणीसाठीच्या सुसंघटित उपक्रमांमुळे कर्करोगपूर्व स्थितींचे लवकर निदान झाल्याने मृत्यूदर २४-३० टक्‍क्‍यांपर्यंत घटू शकतो. महाराष्ट्रामध्ये फिरती तपासणी केंद्रे आणि सामुदायिक कर्करोग शिबिरे यातून अतिधोकादायक गटात मोडणारे व्रण कर्करोगात रूपांतरित होण्याआधीच ओळखले जात असल्याचा प्रभाव याआधीच दिसून आला आहे.”

आपल्या देशात कर्करोगाची ९० टक्‍क्‍यांहून अधिक प्रकरणे तंबाखूसेवानाशी, विशेषत: गुटखा, खैनी आणि सुपारीसारख्या धूरविरहित तंबाखूशी जोडलेली आहेत. मद्यपानामुळे यातील धोका अनेक पटींनी वाढते, तर HPV हे तुलनेने अधिक तरुण, तंबाखू न खाणाऱ्यांच्या बाबतीत चिंतेचा विषय म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातील ओरल कॅन्सरचा सर्वाधिक भार वाहणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. ओरल कॅन्सर हा राज्यातील पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे व स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पाच कर्करोगांमध्ये त्याची वर्णी लागते.

“हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासारखी हॉस्पिटल्स आजाराचे लवकरात लवकर निदान करण्याचे मार्ग आणि प्रगत सर्जिकल तंत्रज्ञान, अचूक पुनर्बांधणी व मल्टिडिसिप्लिनरी देखभाल यांची सांगड घालत तपासणी व आजारातून बचाव यांच्यामधील दरी सांधण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ओरल कॅन्सर हा अशा काही मोजक्या कॅन्सर्सपैकी एक आहे, जिथे लवकर झालेले निदान, तंत्रज्ञानाची मदत यांच्यामुळे आम्ही रोगाच्या परिणतीमध्ये खरोखरीच बदल घडवून आणू शकतो, मात्र जागरुकता असल्यास व रुग्णाला वेळीच आमच्याकडे पाठविले गेल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या कामी आमची मदत होऊ शकते.” डॉ. सुलतान ए. प्रधान पुढे म्हणाले.

वयाच्या ५० व्या वर्षी शरीरात थकवा जाणवतो? मग फिट राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, कधीच होणार नाही आजार

ओरल कॅन्सर लवकरात लवकर दिसून आला तर तो एक टाळता येण्याजोगा व बरा होण्याजोगा आजार आहे. त्याची खरी किंमत केवळ उपचारांमधून नव्हे तर कृतीस होणाऱ्या विलंबातून भरावी लागते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅन्सरची प्रमुख लक्षणे काय आहेत?

    Ans: शरीरावर गाठ येणे आणि ती वेगाने वाढणे, खूप जास्त थकवा, ताप आणि वजन कमी होणे.

  • Que: कॅन्सरची गाठ कशी ओळखावी?

    Ans: गाठ कठीण असते आणि तिचा आकार अनियमित असतो.

  • Que: कॅन्सर होण्याची कारणे काय आहेत?

    Ans: अयोग्य जीवनशैली, जंक फूड आणि लठ्ठपणा

Web Title: Serious problems arise due to late diagnosis of oral cancer which accounts for about 70 80 percent of cases in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • cancer day
  • Cancer prevention
  • world cancer day

संबंधित बातम्या

World Cancer Day 2026: भारतातील Breast Cancer वर 4 उपचारपद्धती, जगण्याची शक्यता वाढवण्यास करतील मदत
1

World Cancer Day 2026: भारतातील Breast Cancer वर 4 उपचारपद्धती, जगण्याची शक्यता वाढवण्यास करतील मदत

१० मिनिटांचा व्यायाम Stomach Cancer पासून वाचवेल जीव! कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जेवणाच्या ताटात असायला हवेत ‘हे’ पदार्थ
2

१० मिनिटांचा व्यायाम Stomach Cancer पासून वाचवेल जीव! कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जेवणाच्या ताटात असायला हवेत ‘हे’ पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.