फोटो सौजन्य - Social Media
लहान बाळांचे डोळे फार संवेदनशील असतात. फक्त डोळेच नव्हे तर संपूर्ण बाळच संवेदनशील असतात. जराशा गोष्टीचा फार मोठा परिणाम होतो, त्यामुळे बाळांच्या बाबतीत सावधानी तर घेतलीच पाहिजे. भारतात बाळ जन्माला आले की काही दिवसांतच त्यांच्या डोळ्यात काजळ ओतण्यास सुरुवात केली जाते. त्यांच्या गालावर, कानाला, माथ्याला तसेच जागा मिळेल तिथे काजळ लावले जाते. डोळ्यांमध्ये काजळ भरण्याचा एक वेगळाच प्रकार देशात दिसून येतो. जरी हे केल्यावर बाळ अधिक गोंडस दिसतो, पण हे फार वाईटही ठरू शकते. बाळाच्या डोळ्यांवर काजळ लावण्याचे वाईट परिणाम दिसून येतात.
डोळ्यांमध्ये जळण जाणवू शकते. तसेच डोळ्यांना सूजही येऊ शकते. काजळमध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांनी बाळाच्या डोळ्यांवर अनेक इतर परिणाम होऊ शकतात. हे फार वाईट ठरू शकते, त्यामुळे शक्यतो लहान बाळांच्या डोळ्यामध्ये काजळ लावणे टाळावे. हे काजळ लहान बाळांच्या डोळ्यांना टोचतात. डोळ्यांचा प्रकाश कमी करण्यासाठी काजळ कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे लहान बाळांसाठी याचा उपयोग टाळलेलेच योग्य!
काजळमध्ये विविध प्रकारचे सुष्मजीव वास्तव्य करतात. जेव्हा आपण आपल्या बाळांना काजळ लावतो. त्यावेळी डोळ्यांमध्ये संक्रमण तयार होते आणि हे वाढत जाते. त्यामुळे काजळ डोळ्यांसाठी ठीक नाही आहे. त्यामुळे त्याचा वापर लहान बाळांसाठी शक्यतो टाळावा.
काजळमध्ये आढळून येणारे तत्व डोळ्यांमध्ये एलर्जी तयार करू शकतात. त्याने डोळ्यांमध्ये जळण तयार होते तसेच सूज तयार होते. तसेच काही तत्व लहान मुलांचा डोळ्यांच्या विकासावरही परिणाम करतात. तसेच त्यांच्या डोळ्यांच्या विकासावर प्रभाव पडतो. या सगळ्या नुकसानांना पाहता लहान बाळांच्या डोळ्यांना काजळ लावणे टाळणेच योग्य ठरते.
पालकांना वाटत असते की काजळ लावल्यामुळे बाळ वाईट नजरेपासून सुरक्षित राहील, मात्र प्रत्यक्षात या प्रथेचा बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळाच्या डोळ्यांमध्ये काजळ लावणे टाळावे. बाळाचे डोळे नैसर्गिकरीत्या सुंदर असतात आणि कोणत्याही कृत्रिम उपायांची त्यांना गरज नसते. बाळाच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता आणि नैसर्गिक आरोग्याच्या तत्त्वांवर भर देणेच योग्य आहे. जर तुम्हाला तरी काजळ लावणे योग्य वाटत असेल तर हे करण्याअगोदर बाळाच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.