आशियातील सगळ्यात जास्त 'शुगर डॅडी' भारतात? खासगी संस्थेच्या दाव्याने खळबळ...(फोटो सौजन्य: iStock)
अलीकडे आधुनिक काळात डेटिंगशी संबंधित अनेक नवीन संकल्पना उदयास आल्या आहेत. तुम्ही, घोस्टिंग, ब्रेडक्रंबिंग, सिच्युएशनशिप यासांरख्या अनेक टर्म्स ऐकल्या असतील. यापैकीच अजून एक टर्म म्हणजे शुगर डॅडी. आता नक्की काय आहे शुगर डॅडी टर्म? तर आपण ते जाणून घेणारच आहोत. पण धक्कादायक बाब म्हणजे भारत हा आशियातील सर्वाधिक जास्त शुगर डॅडी असलेला देश आहे. होय तुम्ही बरोबर वाचलात.
एका सीकिंग अरेंजमेंट या संस्थेच्या अभ्यासानुसार आणि Seasia.stats ने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक शुगर डॅडीच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर असून ही संख्या तब्बल 3 लाख 38 हजार इतकी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी इंडोनेशिया, जेथील संख्या जवळपास 60 हजार 250 आणि तिसऱ्या क्रमांकावर मलेशिया आणि चौथ्या स्थानी जपान या दोन्ही देशांनी 32 हजार 500 शुगर डॅडींसह स्थान मिळवले आहे. याशिवाय या यादीत, 28 हजार 600 संख्येसह पाचव्या क्रमांकावर हॉंगकॉंग, सहाव्या क्रमांकावर तैवान जेथील संख्या 27 हजार 300 आणि शेवटी 3, 500 शुगर डॅडी असलेला देश कंबोडिया आहे.
तुम्हाला आता प्रश्न पडला असेल शुगर डॅडी म्हणजे काय? काय आहे हा ट्रेंड? तर या आधी आपण शुगर डेटिंग काय आहे हे जाणून घेऊयात.
शुगर डेटिंग म्हणजे काय?
तुम्ही अनेक डेटिंगचे प्रकार ऐकले असतील पण शुगर डेटिंग हे इतर डेटिंग पेक्षा काहीशी वेगळी आहे. यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिलेशनशिपमध्ये येतात. हे नाते फक्त प्रेमावर आधारित नसते, तर त्यामध्ये आर्थिक व शारीरिक गरजा पूर्ण होणे महत्त्वाचे ठरते. हे अगदी म्यूचुअल बेनिफिट देणार नाते असते.
कोण असतात शुगर डॅडी?
शुगर डॅडी हा असा पुरुष जो संपन्न, वयाने मोठा, आणि ज्याच्याकडे खुप पैसा असतो. हा पुरुष अर्ध्यापेक्षा कमी वयाच्या मुलीला डेट करतो जिला शुगर बेबी म्हटले जाते. हा पुरुष तिच्यावर भरपूर पैसा खर्च करतो, महागड्या भेटवस्तू देतो, विविध देशता फिरायला घेऊन जातो. आणि आर्थिक मदत करतो. त्याच्या बदल्यात शुगर बेबी त्याला कंपनी देते आणि त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करते.
मुली शुगर डॅडीच्या मागे वेड्या का असतात?
एक मुलगी म्हणून तुम्हाला जर तुमचं सगळं ऐकून घेणार, तुम्हाला दिवस रात्र वेळ देणार, हवं ते घेऊन देणार भेटला तर असा पुरुष नक्कीच आवडेल. म्हणूनच शुगर डॅडी असलेल्या पुरुषांकडे अधिक पैसा आणि स्थिरता असते आणि यामुळे अनेक तरुणी त्यांच्यासोबत नातेसंबंध ठेवतात. काही मुलींची आर्थिक गरज, उच्च जीवनशैलीची इच्छा आणि सुरक्षितता यामुळे त्या शुगर डेटिंगकडे वळतात.
का वाढत आहे हा ट्रेंड?
अलीकडच्या काळात तरुणी करिअर किंवा शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ शोधतात, तर काहीजणी फक्त श्रीमंत पुरुषांसोबत राहून उच्चभ्रू जीवनशैली अनुभवण्यास इच्छुक असतात. दुसरीकडे, काही वयस्कर पुरुषांना तरुण आणि आकर्षक साथीदार हवा असतो, यामुळे दोघांचे गरजांचे गणित जुळून येते आणि हे एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहतात.
खरं तरं शुगर डेटिंगकडे समाजात संशयाने पाहिले जाते, कारण हे नाते प्रेमापेक्षा पैशाच्या गरजांवर अधिक असते. पण अनेकदा काही प्रकरणांमध्ये हे नाते भावनिक बंधनातही रुपांतरित होते. शुगर डेटिंग ही आधुनिक जगातील एक वास्तवता असून. काहींना हे अनैतिक वाटते, तर काहीजण याला म्युच्युअल बेनिफिट रिलेशनशिप म्हणून स्वीकारतात.