Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

तरूणांमध्ये वेगवेगळे आजार वाढत आहेत आणि त्यात भर पडली आहे ती म्हणजे रक्ताच्या गाठी वाढण्याच्या आजाराची. याला धुम्रपान आणि दीर्घकाळ बसणे ही दोन्ही कारणे त्रासदायक ठरत आहेत, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 17, 2026 | 08:19 PM
तरूणांमध्ये का वाढतेय DVT समस्या (फोटो सौजन्य - iStock)

तरूणांमध्ये का वाढतेय DVT समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • रक्ताच्या गाठींचा आजार का वाढतोय 
  • कोणत्या कारणांमुळे तरूणांमध्ये वाढतोय आजार
  • धुम्रपान आणि दीर्घकाळ बसण्याचे दुष्परिणाम 
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत धूम्रपान करणे आणि तासन्‌तास एकाच ठिकाणी बसून काम करणे ही केवळ वाईट सवयच नाही, तर ती गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे. तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही सवयींमुळे शरीरात रक्ताच्या गाठी(ब्लड क्लॉट्स) तयार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. परिणामी डीप वेन थ्रॉम्बोसिस(DVT) आणि जीवघेणा पल्मोनरी एम्बोलिझम यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो.

तज्ज्ञांनी याबाबत व्यक्त केली असून,  धुम्रपान आणि दीर्घकाळ डेस्कवर बसून काम केल्यामुळे ब्लड क्लॉट्स होण्याची समस्या वाढताना दिसत आहेत. पूर्वी डीप वेन थ्रॉम्बोसिस हा प्रामुख्याने वयोवृद्ध किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये आढळत होता. मात्र आता २३ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्येही डीव्हीटी (DVT) चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, विशेषतः शारीरिक हालचालींची कमतरता असणाऱ्या आणि सतत बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. डॉ. जावेद तडवी, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा अस्पताल, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे. 

काय आहे कारण 

डीव्हीटीमध्ये पायांच्या नसांमध्ये रक्ताची गाठ तयार होते, ज्यामुळे पायातील रक्तप्रवाहात अडथळा येतो. ही गाठ फुटुन फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास पल्मोनरी एम्बोलिझम होऊ शकतो, जे अत्यंत जीवघेणा ठरू शकते. वर्क फ्रॉम होम, लॅपटॉपवर सतत काम, लांबचा प्रवास आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक जण तासन्‌तास एकाच स्थितीत एकाच जागी बसून राहतात. त्यातच धूम्रपानाची सवय असल्यास त्याचा धोका वाढतो.

कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होण्याची १२ लक्षणे, सरकारने जारी केलेली यादी : वाचा सविस्तर

कसा होतोय दुष्परिणाम 

धुम्रपान आणि दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून राहणे हे केवळ लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबची समस्याच वाढवत नाही, तर रक्त अधिक घट्ट करते आणि नसांच्या आतील आवरणाला नुकसान पोहोचवते. त्यामुळे पायांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढतो. डीव्हीटीमध्ये पाय दुखणे, सूज येणे, उष्णता जाणवणे, लालसरपणा आणि जडपणा जाणवतो. काही वेळा लक्षणे फारच सौम्य किंवा अजिबात नसतात, त्यामुळे रुग्ण आजाराकडे दुर्लक्ष करतो. मात्र ही गाठ फुफ्फुसांपर्यंत गेल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत वेदना होतात आणि अचानक बेशुद्ध पडणे किंवा मृत्यूदेखील ओढावू शकतो.

कोणत्या वयात होतो आजार

आता डीव्हीटी हा आजार केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. २३ ते ४५ वयोगटातील, दीर्घकाळ बसून काम करणारे आणि नियमित धूम्रपान करणाऱ्या तरुणांमध्ये डीप वेन थ्रॉम्बोसिसची समस्या सुमारे ५०% नी  वाढलेली दिसून येते.आमच्याकडे  दर महिन्याला उरचाराकरिता येणाऱ्या १० पैकी सुमारे ५ रुग्ण पायातील वेदना, सूज, उष्णता आणि लालसरपणाच्या तक्रारी घेऊन येतात आणि त्यांना तातडीच्या उपचारांची गरज भासते.

वेळीच निदान आणि प्रतिबंध महत्त्वाचा

तज्ज्ञांच्या मते, डीव्हीटीचे वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य आहेत. यामध्ये रक्त पातळ करणारी औषधे, कंप्रेशन थेरपी आणि काही रुग्णांमध्ये आधुनिक व्हॅस्क्युलर उपचारांचा समावेश आहे. मात्र उपचारांपेक्षा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे असा मोलाचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

पायांवर दिसून येणाऱ्या ‘या’ रेघांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! शरीरसंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

काय कराल?

  • धूम्रपान पूर्णपणे टाळा
  • दर तासाभरात थोडे चाला, एखादी फेरी मारा
  • दीर्घकाळ बसून काम करत असाल तर कंप्रेशन स्टॉकिंग्स वापरा
  • पुरेसे पाणी प्या
  • वजन नियंत्रणात ठेवा
  • नियमित व्यायामाची सवय लावा
  • पायांची सूज, वेदना किंवा अचानक दम लागणे अशा समस्या आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
बदलत्या जीवनशैलीत बैठे काम टाळता येणार नाही, मात्र योग्य सवयी, जागरूकता आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेतल्यास रक्ताच्या गाठींसारख्या जीवघेण्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करणे नक्कीच शक्य आहे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Smoking and prolonged sitting increase the risk of blood clots problems increasing in young people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • smoking

संबंधित बातम्या

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
1

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
2

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
3

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.