सतत ग्रीन टी प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
वाढलेले वजन कमी करण्यापासून ते रक्ततातील साखरेची पातळ नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन ती प्यायला जातो. सकाळी उठल्यानंतर अनेक लोक दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी पिऊ लागले आहेत. ग्रीन टी चे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, पण अर्ध्यापेक्षा जास्त लोक ग्रीन टी चे चुकीच्या पद्धतीने सेवन करतात. चुकीच्या पद्धतीने ग्रीन टी चे सेवन केल्याने आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आज आम्ही सतत ग्रीन टी प्यायल्यास आरोग्यावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
जास्त प्रमाणात ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. जर तुम्ही दिवसभरातून ३ ते ४ कप ग्रीन प्यायला तर तुम्हाला असिडिटी होऊ शकते. गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दिवसभरातून एकदा किंवा दोनदाच ग्रीन टी प्यावा.
हे देखील वाचा: रोजी सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हा’ पदार्थ, शरीराला मिळेल ताकद
सतत ग्रीन टी प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
अतिप्रमाणात चहाचे सेवन केल्याने झोपेची समस्या उद्भवते, तशीच समस्या ग्रीन टी प्यायल्याने देखील उद्भवते. संध्याकाळच्या वेळी ग्रीन टी प्यायल्याने अशक्तपणा, थकवा, चिडचिडेपणा आणि झोप न लागणे यांसारख्या समस्या उद्भवतात. झोप पूर्ण नाही तर पचनक्रिया बिघडू लागते. त्यामुळे कमीत कमी ग्रीन टी सेवन करावे.
ग्रीन टी मध्ये असलेले गुणधर्म हाडांमधील कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करतात. यामुळे हाडे हळूहळू निकामी होण्यास सुरुवात होते. हाडे कमकुवत झाल्यानंतर ऑस्टियोपोरोसिस नावाचा गंभीर आजार होण्याची भीती असते. यामध्ये शरीरातील हाडांना झालेली किरकोळ दुखापत गंभीर होऊ लागते.
हे देखील वाचा: तुम्हाला टूथपेस्टच्या ‘या’ हॅक्सबद्दल माहिती आहे का? नक्की वाचा
ग्रीन टी चे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अशक्तपणा जाणवू लागतो. जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने ॲनिमिया होऊ शकतो. ग्रीन टी शरीरातील लोहाचे प्रमाण शोषून घेण्यास मदत करतो. यामुळे सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे कमी कमी प्रमाणात ग्रीन टी चे सेवन करावे.