फोटो सौजन्य - Social Media
मानवी जीवनाची सुरवात टूथपेस्टपासूनच होते. सकाळी उठल्यावर तर सगळेच दात घासायला पळतात. बाजारात अनेक प्रकारचे तसेच विविध फ्लेवर्डवाले टूथपेस्टदेखील उपलब्ध आहेत. जरी चव वेगवेगळी असली तरी टूथपेस्टचे काम असते, दातांची सफाई करून शरीराला ताजेतवाने करणे. आता तुम्हाला असे वाटत असले कि टूथपेस्ट फक्त नि फक्त दातांच्या सफाईसाठीच वापरला जातो. तर तुम्ही अतिशय चुकीच्या मार्गाला आहात. टूथपेस्टच्या कव्हरवर जेवढे दाखवले जाते ते तेवढंच नसत, टूथपेस्ट बडी काम कि चीज है बॉस! हे लेख वाचल्यानंतर तुम्ही स्वतः चाट पडणार आहात कि, कालपर्यँत ज्याला आपण फक्त दात साफ करायला वापरत होतो तो टूथपेस्ट इतका भारी आहे.
तुमच्या दातांना चमकवणारा टूथपेस्ट चांदीसारख्या मौल्यवान वस्तूलाही चमकवू शकतो. विश्वास नसत बसेल तर एकदा खरंच करून बघा. चांदीच्या वस्तूंवर टूथपेस्ट लावून हलकेसे घासून घ्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. मग पहा, तुमच्या चांदीची चमक किती प्रखर असेल. तरुणांसाठी सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे, टूथपेस्ट पिंपल्ससाठी चांगला उपाय ठरतो. पिंपल्सवर रात्री झोपण्यापूर्वी थोडीशी टूथपेस्ट लावल्यास, सकाळी पिंपल कमी झालेला दिसतो. टूथपेस्टमधील घटक पिंपल्सची सूज कमी करण्यात मदत करतात.
भिंतीवर लहान डाग असतील तर टूथपेस्टचा उपयोग करून ते डाग काढता येतात. डागावर टूथपेस्ट लावून स्पंजने हलकेसे घासून घ्या आणि नंतर ओल्या कपड्याने पुसून टाका. इतकेच नाही तर फारशीवरील डागांसाठी सुद्धा टूथपेस्ट उपयुक्त ठरेल. तुमच्या शूजची सफाई, तुमच्या कारच्या हेडलाईटची सफाई तर तुमच्या कपड्यांची सफाई सुद्धा टूथपेस्ट मिनटात करून देईल. जर कपड्यावर शाईचा डाग असेल तर तेथे डागावर टूथपेस्ट लावून थोडावेळ ठेवा आणि नंतर धुवून टाका. डाग कमी होईल. या सगळ्या हॅक्सचा उपयोग करून तुम्ही दैनंदिन जीवनात अनेक समस्या सोडवू शकता. हे हॅक्स सोपे, उपयुक्त आणि प्रभावी आहेत.
(टीप: जेव्हा त्वचेसाठी किंवा इतर संवेदनशील वस्तूंसाठी टूथपेस्टचा वापर करता, तेव्हा सौम्य टूथपेस्ट निवडा.)