रिकाम्या पोटी चणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे
सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी आरोग्याला फायदेशीर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर नाश्ता करताना बिस्कीट किंवा ब्रेड खातात, पण याऐवजी उकडवलेले चणे खाल्ल्यास आरोग्याला फायदा होतो.शरीराला शक्ती मिळून आरोग्य सुधारते. रात्रीच्या वेळेस चणे भिजत ठेवून ते सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खावे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. तसेच हृद्यासंबंधित समस्या कमी होतील. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये बाहेरून आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा चणे खावेत. चण्यांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांनासुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रिकाम्या पोटी चणे खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
शरीरात रक्ताची कमतरता भासू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरामध्ये अशक्तपणा वाढू लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर भिजवलेले चणे खावे. भिजवलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम, फायबर आणि प्रथिने असतात, जे आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. सर्वच ऋतूंमध्ये चणे खाल्ल्यास आरोग्याला शरीराला ऊर्जा मिळते. तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हे देखील वाचा: पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित करा तुळशीच्या चहाचे सेवन, जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी सकाळी उठल्यावर नियमित चणे खावेत. चण्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते. शाहाकारी असलेल्या लोकांनी नियमित मूठभर भिजवलेले चणे खावेत. चणे खाल्ल्याने अंडी किंवा चीज खाण्याची आवश्यकता भासणार नाही.
चण्यांमध्ये असलेल्या फायबरमुळे ह्रयद्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. भिजवलेले चणे शरीरातील रक्ताची साखर आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. चण्यांचे सेवन केल्याने पित्ताचा त्रास जाणवत नाही.
हे देखील वाचा: ‘या’ पदार्थांचे सेवन म्हणजे शरीर A1 होण्याची हमी
सकाळी उठल्यानंतर भिजवलेले चणे खाल्ल्यास काही दिवसांमध्येच चेहऱ्यावर फरक दिसून येईल. त्यामुळे त्वचा आणि केसांना फायदे होतात. त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते. तसेच कमकुवत झालेली केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते.