
कोल्ड कॉफीच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा रोजच्या दैनंदिन आहारात अनेकांना कोल्ड कोफी पिण्याची सवय असते. कोल्ड कॉफी प्याल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो. शरीरामधील कमी झालेली ऊर्जा झपाट्याने वाढवण्यासाठी अनेक लोक कॉफी पितात. कॉफीच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. जास्त प्रमाणात कॉफी प्याल्याने अशक्तपणा किंवा पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त प्रमाणात कोल्ड कॉफीचे सेवन करू नये. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी कॉफीचे जास्त सेवन करू नये.
सकाळी उठल्यानंतर अनेक लोक सगळ्यात आधी कॉफी पितात. कॉफी प्याल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. पण अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. आज आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य- istock)
अनेकदा बाहेर गेल्यानंतर आपण जास्त जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन करतो. प्यायला थंड असलेली कॉफी आरोग्यासाठी खूपच घातक आहे. यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात कॉफी पिऊ नये असा सल्ला दिला जातो.
मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखर वाढून आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये असलेल्या साखरेमुळे रक्तात साखर वाढत जाते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी जास्त कॉफी पिऊ नये.
अतिप्रमाणात कॉफी प्यायल्याने पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त कॉफी पिऊ नये.कॉफी प्याल्याने आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते. कोल्ड कॉफी प्यायल्यानंतर अनेकांना गॅस आणि ॲसिडिटी होते.
अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त कोल्ड कॉफी पिऊ नये. अति प्रमाणात सेवन केल्याने रात्रीची निद्रानाश होते.