सतत चहा प्याल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
भारतासह जगभरात सगळीकडे चहाप्रेमी आहेत. अनेकांना चहा पिण्याचे व्यसनचं लागले आहे. काहींच्या दिवसाची सुरुवात चहाने होते तर काहींना दिवसभर सतत चहा लागतो. चहा प्यायल्याशिवाय काम करण्याची इच्छा होत नाही. अनेक लोक रात्रीच्या वेळेस झोप येत नसल्यास चहा बनवून पितात. काहींना मध्यरात्री उठल्यानंतर सुद्धा चहा लागतो. पण सतत चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कारण चहामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफेन आढळून येते, जे आरोग्यासाठी अतिशय वाईट आहे. सतत चहाचे सेवन केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी चहाचे सेवन करावे. दिवसभरात सतत चहा पिण्याऐवजी दिवसातून दोनदाच चहा प्यावा. आज आम्ही तुम्हाला सतत चहाचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सतत चहाचे सेवन केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. शिवाय सतत चहा पिणे आरोग्यासाठी घातक आहे. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पित्त, अपचन, असिडिटी, छातीमध्ये जळजळ इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही वेळेस चहाचे सेवन करू नये. रात्रीच्या वेळी शांत झोप लागण्यासाठी कमीत कमी प्रमाणात चहाचे सेवन करावे.
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, जंक फूड, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर हळूहळू हृदयाचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. शिवाय दैनंदिन आहारात कमीत कमी चहाचे सेवन करावे. हल्ली कमी वयातच अनेकांना हृदयविकाराचे झटके येणे, हृदयविकाराने निधन होणे इत्यादी समस्या वाढू लागल्या आहेत.
सतत चहाचे सेवन केल्यामुळे पचनक्रियेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करावे. काहींना जेवनाच्याआधी चहा पिण्याची सवय असते. पण असे केल्यामुळे पचनसंस्था बिघडून पोट फुगणे, पचनाचा त्रास इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवणाच्या आधी चहाचे सेवन करण्याऐवजी भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सतत चहाचे सेवन केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी कॅफेनचे सेवन करावे. सतत विचार केल्यामुळे आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी कधीही चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात कॅफेनची वाढ होते. डोकेदुखी आणि झोप पूर्ण न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.