या आजारामुळे गालावर आणि नाकावर येतात काळे डाग! दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय येतील कामी
बदलत्या काळानुसार आपल्या चेहऱ्याची काळजी देखील घ्यायला हवी. अनेकदा अयोग्य जीवनशैलीमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे आणि तपकिरी डाग येऊ लागतात. या डागांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. हे काळ डाग म्हणजे मेलाज्मा हा आजार असू शकतो. विशेषत: 21 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये आढळणारी मेलाज्मा आजाराची लक्षणे दिसू लागतात.
या आजरात अचानक चेहऱ्यावर हलके तपकिरी डाग दिसू लागतात. मेलाज्मा ही समस्या त्वचेतील मेलेनिन नावाच्या पिगमेंटच्या असमतोलामुळे होते. मेलेनिन हा हार्मोन आहे जो आपल्या त्वचेचा रंग ठरवतो. जर याचे उत्पादन असामान्य पद्धतीने झाले तर त्वचेवर काळे डाग तयार होतात, ज्याला पिग्मेंटेशन म्हणतात. या आजराचा सामना कसा करावा आणि चेहऱ्यावर आलेले डाग दूर कसे करावे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – चरबीमुळे चेहरा फुग्यासारखा गुबगुबीत झालाय? मग या पदार्थांचे सेवन करा, रातोरात चरबी होईल कमी
सूर्यकिरणांपासून बचाव
सूर्याकिरणांच्या अतिरिक्त संपर्कात आल्यामुळे मेलाज्मा आजार होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा आपल्या त्वचेवर UV किरणांचा परिणाम होतो तेव्हा त्वचेतील मेलेनिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे त्वचेवर डाग दिसू लागतात. यामुळेच घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. कधीही 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन वापरावा. याशिवाय, शक्यतो उन्हात थांबणे टाळावे आणि कॅप, सनग्लासेस, किंवा छत्रीचा वापर करा.
आहार आणि हायड्रेशन
आपला आहार आपल्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करत असतो. मेलाज्मापासून बचाव करण्यासाठी फळे भाज्या अशा पोषक घटकांचा आपल्या आहारात समावेश करावा. व्हिटॅमिन C आणि ई चे भरपूर सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते. तसेच भरपूर पाणी प्यावे. पाणी त्वचेला हायड्रेट करून त्वचेतील आद्रता कायम राखते आणि यामुळे डागांच्या प्रमाणात घट होऊ शकते.
घरगुती उपायांचा वापर
हेदेखील वाचा – बाथरूममधील बुळबुळीत-चिकट आंघोळीच्या बादल्या क्षणार्धात करा साफ, हे घरगुती पदार्थ येतील कामी
लिंबाचा रस
लिंबामध्ये असलेले सायट्रिक ॲसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. यासाठी ताजा लिंबू घेऊन त्याचा रस एका वाटीत काढून घ्या. हा रस चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे तसाच राहूद्या. मग चेहरा पाण्याने धुवून स्वछ करा.
हळदीचा फेसपॅक
हळदीमधील अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यास मदत करते. याचा फेसपॅक चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यास फार फायद्याचा ठरू शकतो. यासाठी एका वाटीत हळद, बेसन आणि दूध टाकून याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे ठेवा आणि मग चेहरा पाण्याने स्वछ करा.
कच्च्या बटाट्याचा रस
कच्च्या बटाट्यातील एन्झाईम त्वचेवरील डाग कमी करण्यास उपयुक्त असतात. यासाठी बटाट्याचा रस एका वाटीत काढा आणि चेहऱ्याला लावा. काहीवेळ तसेच राहूद्या आणि मग पाण्याने चेहरा स्वछ करा.