घराची स्वछता राखण्यासाठी घरातील कानाकोपरा साफ करणे आवश्यक आहे. अनेकदा आपण घरातील बाकी सर्व गोष्टी चकचकीत करतो मात्र बाथरूम साफ करणे राहून जाते. त्यातही बाथरूममधील वस्तूंकडे आपले लक्षही जात नाही. सततच्या वापरामुळे बाथरूममधील बादल्या चिकट होत असतात. पाण्याच्या सतत माऱ्यामुळे यांवर चिकट आणि पिवळे किंवा पांढरे डाग पडू लागतात. यांना साफ न केल्यास हे डाग आणखीन चिवट होऊ लागतात आणि मग यांना साफ करणे कठीण होऊन बसते. हे डाग मुख्यतः पाण्यातील खनिज पदार्थ, साबणाचे अवशेष, किंवा हार्ड वॉटरमुळे तयार होतात.
अनेकजण हे डाग घालवण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त क्लिनर्सचा वापर करतात, याने डाग तर जातात मात्र यातील रासायनिक घटक त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, बाथरूमवरील चिकट बदल्या साफ करण्यासाठी तुम्ही काही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. हे घरगुती उपाय ह स्वस्त, सुरक्षित, आणि प्रभावी पर्याय आहेत.
हेदेखील वाचा – चरबीमुळे चेहरा फुग्यासारखा गुबगुबीत झालाय? मग या पदार्थांचे सेवन करा, रातोरात चरबी होईल कमी
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण बादलीवरील चिवट डाग दूर करण्यास एक प्रभावी उपाय आहे. यासाठी एका वाटीत एक काप चमचा व्हिनेगर घ्या आणि यात दोन चमचे बेकिंग सोडा टाका. दोन्ही साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळा आणि याला फेस आला की याच्या मदतीने बदलीवरील डाग घासून साफ करा. यानंतर 15-20 मिनिटे हे मिश्रण बादलीवर तसेच राहूद्या आणि मग पाण्याने बदली स्वछ धुवून काढा. व्हिनेगरमधील नैसर्गिक ॲसिडिक गुणधर्म आणि बेकिंग सोडातील गुणधर्म चिवट डाग साफ करण्यास अंत्यंत प्रभावी ठरतात. त्यामुळे डाग दूर होऊन पृष्ठभाग चमकदार होण्यास मदत होते.
लिंबू आणि मीठ
लिंबाचा रस नैसर्गिक क्लिनर म्हणून ओळखला जातो. यासाठी एका वाटीत एका चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मीठ घ्या आणि एकत्र मिसळा. हे मिश्रण चिकट बकेटवर चोळा आणि 15-20 मिनिटे तसेच राहूद्या. त्यांनतर बकेटला स्क्रबरच्या मदतीने घासा आणि मग पाण्याने बकेट स्वछ करा. लिंबातील सायट्रिक ऍसिड डागांवर परिणाम करतात तर मिठातील गुणधर्म प्रक्रियेला अधिक प्रभावी करण्यास मदत करतात.
हेदेखील वाचा – या हिरव्या भाजीपासून बनवा नॅचरल कंडिशनर, काही मिनिटांतच केस होतील स्मूद आणि चमकदार
डिटर्जंट पावडर आणि पाणी
डिटर्जंट पावडर हे कपडे धुण्यासाठी वापरले जाते मात्र तुम्ही याचा वापर बादली साफ करण्यासाठीदेखील करू शकता. यासाठी एक चमचा डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळून याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चिकट झालेल्या बदलीवर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहूद्या. यानंतर स्क्रबरच्या मदतीने बादली घासून काढा आणि मग पाण्याने बादली धुवून स्वछ करा. डिटर्जंट पावडरमधील घटक चिवट डाग दूर करण्यास फायदेशीर ठरतात.