मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचेवर दिसून येणाऱ्या समस्या:
सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. मेकअप केल्यामुळे महिलांच्या सौंदर्यत आणखीन वाढ होते. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप आले आहेत. त्यात एच.डी मेकअप, हायड्रा मेकअप इत्यादी प्रकार असून लग्न समारंभाच्या दिवशी किंवा इतर कार्यक्रमांच्या दिवशी या प्रकारचे मेकअप केले जातात. सोशल मीडियावरील रिल्समध्ये मेकअप करण्याआधीचा चेहरा आणि मेकअप केल्यानंतर चेहऱ्यामध्ये दिसणारा फरक दाखवला जातो. पण त्वचेसंबंधित अशा अनेक समस्या आहेत ज्या मेकअप केल्यानंतरसुद्धा कमी होत नाहीत. मेकअप केल्यानंतर त्वचा सुंदर आणि आकर्षक दिसते. मात्र मेकअप करण्याआधी त्वचेवरील सर्व समस्या स्पष्टपणे दिसून येतात. त्वचेसंबंधित समस्या लपवण्यासाठी चेहऱ्यावर मेकअप केला जातो.मात्र काही समस्या या मेकअप करूनसुद्धा लपवल्या जात नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेकअप केल्यानंतरसुद्धा त्वचेवर कोणत्या समस्या दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वय वाढल्यानंतर संपूर्ण शरीरात अनेक वेगवेगळे बदल होऊ लागतात. त्वचा, नाक, डोळे, चेहरा इत्यादी गोष्टींमध्ये झालेले बदल स्पष्टपणे दिसून येतात. वय वाढल्यानंतर डोळ्यांखाली सुरकुत्या येणे, डार्क सर्कल्स, डोळ्यांखाली सूज येणे, पफीनेस इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. यात डोळ्यांखाली प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे डोळ्यांखाली आलेले आय बॅग्स. ही समस्या मेकअप करूनसुद्धा लपवता येत नाही. डोळ्यांखाली आय बॅग्स आल्यानंतर डोळ्यांचा एक भाग फुगीर दिसतो. शिवाय डोळे सुजल्यासारखे दिसू लागतात. या आय बॅग्स कितीही काही केलं तरीसुद्धा लपवता येत नाहीत.
अनेक महिला पिंपल्स लपवण्यासाठी चेहऱ्यावर वेगवेगळ्या क्रीम्स आणि भरपूर मेकअप करतात. मात्र या सगळ्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. पिंपल्स आल्यानंतर काही दिवसांनी पिंपल्स निघून जातो. मात्र त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात. पिंपल्स आलेल्या जागी त्वचेचा काही भाग उंच दिसू लागतो, ज्यामुळे चेहऱ्यावर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही. त्यामुळे पिंपल्स लपवण्यासाठी मेकअप करत असाल तर वेळीच थांबा. यामुळे आणखीन पिंपल्स वाढण्याची शक्यता असते.
महिलांमध्ये सामन्याता ओपन पोर्सची समस्या आढळून येते. कितीही चांगला मेकअप केला तरीसुद्धा त्वचेवर ओपन पोर्स दिसून येतात. मेकअप करूनसुद्धा ओपन पोर्स लपवता येत नाहीत. ओपन पोर्सच्या समस्येपासून त्रस्त असलेल्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून त्वचेची काळजी घ्यावी.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वय वाढल्यानंतर सर्वाधिक समस्या चेहऱ्यावर दिसून येतात. त्यामुळे त्वचेच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांच्या आजूबाजूला बारीक रेषा दिसू लागतात. शिवाय कपाळावर सुद्धा वृद्धत्वाच्या खुणा दिसण्यास सुरुवात होते. या बारीक रेषा मेकअप केल्यानंतर सुद्धा लपवता येत नाहीत. त्यामुळे अतिप्रमाणात मेकअप कारण्याऐवजी त्वचेला सूट होईल असा मेकअप करावा.