फोटो सौजन्य - Social Media
थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. जसजसा हा हंगाम वाढत जातो आणि वातावरण अधिक थंड होत जाते. तसतसे जुन्या दुखण्याला पुन्हा सुरुवात करण्यास संधी मिळते. यामध्ये अनेक कारणे असतात. सांधेदुखी, रुमेटॉइड आर्थरायटिस, ल्यूपस किंवा फायब्रॉमायल्जिया यांसारख्या आजारांनी त्रस्त लोकांमध्ये थंडीमध्ये वेदना तीव्र होण्याचे प्रमाण जास्त असते. थंड हवेचा परिणाम स्नायूंवर मोठ्या परिणामात होतो. थंड हवेत स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे सांध्यांच्या लवचिकतेमध्ये कमतरता दिसून येते. वेदना वाढू लागतात. मुळात, बारोमेट्रिक दाबातील बदलांमुळेही हा त्रास होतो.
थंडीमध्ये जुन्या आजरांना वाढ मिळते किंवा नाहीसे झालेले दुखणेही समोर येऊ लागतात. स्नायूंमध्ये होणारा ताण थंड वातावरणामुळे वाढत जाणतो आणि परिणामी, सांध्यामध्ये हालचाल फार कमी होते आणि वेदना होऊ लागतात. थंड वातावरणात शरीरातील बारोमेट्रिक दाबातील होणारे बदल यांमुळे टेंडन्स, स्नायू आणि आजूबाजूच्या ऊतकांवर परिणाम होतो, ज्यामुळे जळजळ आणि वेदना वाढू शकतात. थंडीमध्ये सुर्यप्रकाश कमी मिळतो, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी घसरते, जी हाडांच्या मजबुतीसाठी महत्त्वाची आहे.
शरीर उबदार ठेवा. बाहेर जाताना उबदार कपडे घाला. थर्मल इनरवेअर, गरम मोजे आणि हातमोजे वापरा. आपल्या शरीराला गरम ठेवा. घरात स्लिपर आणि इलेक्ट्रिक ब्लँकेटचा उपयोग करा. गरम पाण्याने अंघोळ केल्याने सांध्यांभोवतीच्या स्नायूंना आराम मिळतो. गरम पाण्याच्या पिशवीचा सांधेदुखीसाठी उपयोग करू शकता. हिवाळ्याच्या दिवसांत दररोज व्यायाम करत चला. रोजचे व्यायाम हाडे आणि स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करतात. योग, तैराकी किंवा स्ट्रेचिंग यांसारख्या हलक्या व्यायामांचा अवलंब करा. तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणा. मशरूम, दूध, हल्दी, लसूण आणि आले यांचा आहारात समावेश करा. रोज किमान 10-15 मिनिटे ऊन्हात बसा. या दिवसांत शरीराला जितकी उब दिली जाईल तितके शरीरासाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठी छान आहे.
थंडीमुळे होणाऱ्या त्रासाला कमी करण्यासाठी वरील उपाय नियमित पाळा. आरोग्यदायी जीवनशैली आणि संतुलित आहार सांधेदुखीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. या उपायांना वापरात आणल्याने सांधेदुखीचा त्रास असो वा इतर वेदनांची समस्या यातून बऱ्यापैकी मुक्तता मिळेल. जर तुम्हाला या थंडीच्या दिवसात या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत तर नक्कीच या उपायांचा अवलंब करा आणि शरीराला या त्रासापासून मुक्त करा.