Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन, जाणून घ्या कोमात जाण्याची कारणे

'झोपेचा राजकुमार" म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन झाले आहे. जाणून घ्या कोमात जाण्याची सविस्तर कारणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2025 | 10:54 AM
सौदी अरेबियाचे 'स्लीपिंग प्रिन्स' यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन,

सौदी अरेबियाचे 'स्लीपिंग प्रिन्स' यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन,

Follow Us
Close
Follow Us:

सौदी अरेबिया आणि अरब जगात ”झोपेचा राजकुमार” म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद यांचे 19 जुलैला वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले. मागील 20 वर्षांपासून प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद हे कोमात होते. मात्र अखेर 19 जुलैला त्यांचे निधन झाले. रॉयल कोर्टाने सौदी प्रेस एजन्सीद्वारे त्यांच्या मृत्यूची घोषणा केली आहे. त्यांच्या निधनामुळे सौदी राजघराण्याच्या आयुष्यातील एका दीर्घ आणि खोल भावनिक अध्यायाचा अंत झाला आहे.त्यांनी संपूर्ण प्रदेशात प्रार्थना, सहानुभूतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या मृत्यूमुळे दुःखद प्रवासाचा शेवट झाला. 2005  मध्ये झालेल्या गंभीर कार अपघातामध्ये प्रिन्स अल-वलीद कोमात गेले होते. 20 वर्ष कोमात राहिल्यानंतर त्यांचा अखेर मृत्यू झाला.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

छातीमध्ये जमा झालेला कफ होईल कायमचा नष्ट! ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, फुफ्फुसांमधील घाण जाईल बाहेर

प्रिन्स अल-वलीद हे प्रिन्स खालेद बिन तलाल अल सौद यांचे ज्येष्ठ पुत्र आणि अब्जाधीश उद्योगपती प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांचे पुतणे होते. त्यांचा जन्म 1990 मध्ये झाला होता. तरुण वयात लष्करी शिक्षण घेण्यासाठी ते लंडनमध्ये गेले होते. त्यावेळी ते फक्त 15 वर्षांचे होते. लंडनमध्ये झालेल्या अपघातात मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि अंतर्गत दुखापत झाली. ज्यामुळं मागील अनेक वर्षांपासून ते कोमात होते. आज आम्ही तुम्हाला अपघातानंतर व्यक्तीला कोमात का जातात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

कोमात जाण्याची प्रमुख कारणे:

  • मेंदूला मार लागणे
  • मेंदूतील रक्तस्त्राव
  • मेंदूला होणारा संसर्ग
  • स्ट्रोक
  • यकृताचे विकार
  • हृदयविकार
  • शरीरातील ऑक्सिजनची कमतरता
बऱ्याचदा आपल्याला कानावर पडते की, रस्ते अपघातानंतर व्यक्ती कोमात गेली. याचा संबंध कधी हाय ब्लडप्रेशर, शुगर, हृदयाशी संबंधित प्रदीर्घ दुखण्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे पेशंट कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये अनेक लोक कोमात जातात. कारण मेंदूला होणाऱ्या गंभीर दुखापतीमुळे ही समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. कोमात जाणे हा कोणताही आजार नसून मेंदूला झालेल्या गंभीर दुखापती लक्षण आहे.

किडनी स्टोन झाल्याची लक्षणे कोणती? काय आहेत उपाय? जाणून घ्या कारणं

मेंदूतील रेटिक्युलर ‌अ‍ॅक्टीव्हेटींग सिस्ट‌म व्यक्तीच्या जागृतावस्थेवर कायमच नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे शरीराचे सर्वच स्नायू व्यवस्थित काम करतात. विचार करणे, वाचन, लिखाण इत्यादी अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. रेटिक्युलर ‌अ‍ॅक्टीव्हेटींग सिस्ट‌मला ज्यावेळी दुखापत होते, त्याक्षणी व्यक्ती कोमात जाण्याची लक्षणे शरीरात दिसून येतात. यामुळे बऱ्याचदा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. कोमात गेलेली व्यक्ती शुद्धीत येण्यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी लागतो तर काहींचा कोमात असतानाच मृत्यू होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Sleeping prince of saudi arabia dies after being in coma for 20 years know the causes of coma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • brain
  • Health Care Tips
  • lifetyle tips

संबंधित बातम्या

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
1

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
2

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
3

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
4

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.