(फोटो सौजन्य: Pinterest)
व्हिनेगरचा करा वापर
जर तुम्ही मोज्यांमधून येणाऱ्या दुर्गंधीने हैराण झाले असाल आणि वारंवार ते धुऊनही जर तुम्हाला समस्येचे समाधान मिळत नसेल तर हा उपाय तुमच्या कामाचा ठरु शकतो. यासाठी मोज्यांवर व्हिनेगरने स्प्रे करा आणि काहीवेळ याला असेच राहू द्या. यामुळे मोज्यांमधून येणारी दुर्गंधी दूर होईल आणि तुम्ही विनासंकोच त्यांना पायांत घालू शकता.
टॅल्कम पावडर येईल कामी
तुमच्या घरी टॅल्कम पावडर असल्यास बूट किंवा मोज्यांमधील दुर्गंध वास तुम्ही याच्या मदतीने सहज दूर करु शकता. या उपायासाठी मोजे पायात घालण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर टॅल्कम पावडर शिंपडा. असे मानले जाते की, या पावडरमुळे घाम, दुर्गंध वास आणि बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते.
उन्हात सुकवा
लक्षात घ्या, दुर्गंध वास दूर करण्यासाठी मोज्यांना कडक उन्हात सुकवणे फायद्याचे ठरु शकते. मोजे कधीही ओले पायांत घालू नये यामुळे वास वाढू शकतो आणि बॅक्टेरिया पायांच्या तळव्यांवर येऊन बसू शकतात. म्हणूनच आधी कडक उन्हात किंवा ताज्या हवेत त्यांना सुकवा आणि मगच पायांत घाला.
रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
या गोष्टी ध्यानात असूद्यात






