Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोरणं वाटतंय सामान्य? घशाच्या कॅन्सरचा धोका घोरणाऱ्यांना अधिक, काय सांगतो अभ्यास

Throat Cancer Sign: झोपेत घोरणे ही एक सामान्य समस्या मानली जाते, परंतु तुम्हाला माहीत आहे का की हे गंभीर आजाराचे लक्षणदेखील असू शकते? अनेक संशोधनांनुसार, सतत आणि जोरात घोरणे हे घशाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. हे वाचून धक्का बसला ना? मात्र काही अभ्यासात याचा शोध लावण्यात आला आहे. या लेखातून आपण अधिक माहिती घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2024 | 10:08 AM
घोरण्यामुळे उद्भवू शकतो घशाचा कर्करोग

घोरण्यामुळे उद्भवू शकतो घशाचा कर्करोग

Follow Us
Close
Follow Us:

घोरणे ही एक सामान्य समस्या मानली जाते, परंतु सतत घोरणे हे गंभीर आजाराचे लक्षणदेखील असू शकते? अनेक संशोधनांनुसार असे सांगण्यात आले आहे की, सतत आणि जोरात घोरणे हे घशाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी घोरण्याच्या समस्येने त्रस्त असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे केवळ झोपेच्या गुणवत्तेवरच परिणाम करत नाही तर आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते.

घोरणे म्हणजे अनेकदा झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे घडणारी क्रिया, ज्याला स्लीप एपनिया म्हणतात. झोपेच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा वायुमार्ग अरुंद होतो किंवा अवरोधित होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा ही स्थिती उद्भवते. या समस्येकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास घसा आणि श्वसनमार्गाच्या पेशींना हानी पोहोचते, जी कालांतराने कर्करोगाचे रूप धारण करू शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार घोरणे ही समस्या कर्करोगात बदलू शकते. (फोटो सौजन्य – iStock) 

घोरण्याची कारणे 

लठ्ठपणा: जास्त वजन हे घोरण्याचे एक प्रमुख कारण आहे, कारण घसा आणि मानेभोवती चरबी श्वासोच्छवासाची नळी अरुंद करते.

अ‍ॅलर्जी: नाक किंवा घशात सूज आणि बलगम जमा झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे घोरण्याची क्रिया होते

मद्यपान आणि धुम्रपान: मद्यपान आणि धुम्रपानामुळे घशाचे स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे वायुमार्ग अरुंद होतो आणि घोरणे सुरू होते

झोपण्याची स्थिती: पाठीवर झोपल्याने वाऱ्याच्या नळीवर दाब वाढतो, ज्यामुळे घोरण्याची शक्यता वाढते

हेदेखील वाचा – Liver Cancer झाल्यास शरीर देतं ‘हे’ संकेत, न ओळखता आल्यास वाढू शकतात समस्या

घोरण्यावरील सोपे उपाय

  • जर तुम्ही लठ्ठ असाल तर वजन कमी केल्याने तुमची घोरण्याची समस्या सुधारू शकते. यामुळे श्वसनमार्गावरील दाब कमी होतो आणि श्वास घेणे सोपे होते
  • पाठीवर झोपण्याऐवजी डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपा. यामुळे श्वसनमार्गावर कमी दाब पडेल आणि घोरण्याची समस्या कमी होईल
  • मद्यपान आणि धूम्रपान करणे बंद करा. यामुळे घशाचे स्नायू मजबूत राहतील आणि घोरण्याची समस्या कमी होईल
  • झोपण्यापूर्वी वाफ घेतल्याने नाक आणि घसा साफ होतो, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि घोरण्याची समस्या कमी होते
  • नियमित व्यायामामुळे तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि घोरण्याची समस्या सुधारू शकते
  • नियमित आणि पुरेशी झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे, घशाचे स्नायू देखील सैल होऊ शकतात, ज्यामुळे घोरण्याची समस्या वाढते
जर तुमचे घोरणे जास्त होत असेल आणि वरील उपायांनी सुधारणा होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. तो तुमच्या स्थितीचे अचूक निदान करू शकतो आणि योग्य उपचार देऊ शकतो.

हेदेखील वाचा – Kidney Cancer Day: मूत्रपिंडाचा कर्करोग कशामुळे होऊ शकतो? लक्षणे आणि संबंधित धोक्यांची माहिती

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Snoring could be warning sign of throat cancer how to get rid of snoring problem know the fact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Health News: महाड तालुका आजही ‘कुपोषणग्रस्त’; ‘पोषण महा’ उपक्रम राबविण्यात तालुक्याचा दुसरा क्रमांक
1

Health News: महाड तालुका आजही ‘कुपोषणग्रस्त’; ‘पोषण महा’ उपक्रम राबविण्यात तालुक्याचा दुसरा क्रमांक

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत
2

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर
3

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.