किडनी कॅन्सर डे (फोटो सौजन्य - iStock)
मूत्रपिंडाचा कर्करोग, ज्याला मूत्रपिंडाच्या पेशींचा कर्करोग देखील म्हणतात, हा एक प्रकारचा कर्करोग ज्याची सुरूवात मूत्रपिंडांमध्ये होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी त्याची कारणे, लक्षणे आणि जोखीम समजून घेणे महत्वाचे आहे.
यासंदर्भात माहिती देऊन तो टाळण्याविषयी मदत करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. न्यूबर्ग सेंटर फॉर जेनोमिक सेंटर येथील डॉ. कुंजल पटेल, मॉलीक्युलर ऑन्कोपॅथोलॉजिस्ट यांनी याबाबत अधिक मोलाचा सल्ला दिला आहे.
मूत्रपिंडाच्या कर्करोगाची कारणे
किडनी कॅन्सरची कारणे (फोटो सौजन्य – iStock)
मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे नेमके कारण निश्चितपणे समजलेले नाही, परंतु अनेक जोखीम घटक ओळखले गेले आहेत. यामध्ये अनुवांशिक बदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, वॉन हिप्पल – लिंडाऊ सारख्या विकारामुळे धोका वाढतो. पर्यावरणीय संपर्क आणि जीवनशैली हे देखील महत्वाचे घटक आहेत. धूम्रपान हा एक प्रमुख जोखीम घटक आहे, ज्यामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्यता दुप्पट होते. लठ्ठपणा हा आणखी एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे, कारण शरीराचे जादा वजनामुळे हार्मोनल मध्ये बदल होऊ शकतात ज्यामुळे कर्करोगाच्या वाढीस चालना मिळू शकते.
काय असतो धोका?
मूत्रपिंडाचे कार्य आणि संरचनेवर उच्च रक्तदाबाच्या परिणाम होत असल्यामुळे उच्च रक्तदाब, किंवा हायपरटेन्शन मुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त, मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम झाल्याने करणे आवश्यक असलेले डायलिसिस उपचार खूप दिवस करावे लागल्यास मूत्रपिंडामध्ये गाठी निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, त्यातील काही कर्करोगाच्या असू शकतात. पेट्रोलियम उद्योग, एस्बेस्टॉस आणि कॅडमियम यासारख्या उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तीचा रसायनांशी येणाऱ्या संपर्कामुळे देखील मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे
बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे तपासणीशिवाय लक्षात येणे कठीण असते. तथापि, जसजसा कर्करोग वाढत जातो तशी अनेक लक्षणं दिसू लागतात. मूत्रावाटे रक्त जाणे (हेमॅटुरिया) हे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. लक्षणे अधूनमधून जाणवतात, तर काहीवेळा फक्त सूक्ष्म तपासणीद्वारे लक्षात येते.
ही लक्षणे विशिष्ट नाहीत आणि ती इतर विकारांची देखील असू शकतात, जर ती कायम राहिली तर वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक ठरते.
जोखीम/धोके
किडनी कॅन्सरमधील धोके (फोटो सौजन्य – iStock)
मूत्रपिंडाचा कर्करोग फुफ्फुस, हाडे, यकृत आणि मेंदूसह शरीराच्या इतर भागांमध्ये मेटास्टेसाइज होऊ शकतो किंवा पसरू शकतो. प्राथमिक ट्यूमरचा आकार आणि कर्क रोगाच्या स्टेजनुसार मेटास्टेसीसचा धोका वाढतो. मेटास्टॅटिस रोखण्यासाठी आणि उपचारांचे चांगले परिणाम साधण्यासाठी लवकर निदान करणे महत्वाचे आहे.
लवकर निदान आवश्यक
लवकर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी मूत्रपिंडाच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे आणि धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. अनुवांशिक घटक, जीवनशैलीची निवड आणि पर्यावरणीय संपर्क यामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या विकासास मदत होते. मूत्रावाटे रक्त जाणे, सतत पाठदुखी आणि विनाकारण वजन कमी होणे यासारख्या लक्षणांची जाणीव वैद्यकीय तपासणी करण्यास प्रवृत्त करू शकते. ज्यांची जोखीम वाढलेली आहे अशा लोकांसाठी नियमित तपासणी आणि देखरेख करणे, सुधारित रोगनिदान आणि लवकर उपचार सक्षम करणे आवश्यक आहे.