Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Mental Health Day: सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर पडणारा परिणाम, स्क्रिनच्या पलीकडचं वास्तव

World Mental Health Day: गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचं जाळं तुफान पसरलं आहे आणि यामध्ये सर्वाधिक गुरफटले गेले आहेत ते म्हणजे तरूण आणि अगदी लहान मुलंदेखील. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. यानिमित्ताने सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर नक्की काय परिणाम होतोय ते आपण तज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार यांच्याकडून जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 10, 2024 | 11:14 AM
सोशल मीडियाचा मनावर काय होतोय परिणाम

सोशल मीडियाचा मनावर काय होतोय परिणाम

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया २००० च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रेंडस्टर, मायस्पेस, लिंक्डइन या प्लॅटफॉर्म्सच्या उदयानंतर महत्त्व प्राप्त करू लागला आणि आजच्या घडीला, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि एक्स (पूर्वी ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्म्सनी त्याची जागा घेतली आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतात १८-२५ वयोगटातील लोक सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत, त्यापैकी ३१% लोकं सहा ते नऊ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात. 

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार म्‍हणाले, सोशल मीडिया हे नवीन लोकांशी संवाद साधण्यासाठी, आपले प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी, विविध मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्यासाठी आणि सर्जनशील कल्पना मांडण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. मात्र, सोशल मीडियाच्या या सकारात्मक बाजूसोबत त्याची एक नकारात्मक बाजूही आहे, विशेषतः तरुणांमध्ये. तरुण वर्गामध्ये सोशल मीडियाच्या वापराचे नकारात्मक परिणाम हे सकारात्मक परिणामांपेक्षा खूप जास्त आहेत.

काय आहेत कारणं 

मानसिक आरोग्य बिघडण्यामागील कारणं

या सगळ्यात मोठं कारण म्हणजे FOMO (एफओएमओ) – म्हणजेच “फीअर ऑफ मिसिंग आउट” (काहीतरी चुकतंय अशी भीती). हा शब्द २००४ साली पहिल्यांदा वापरला गेला होता, आणि आजही सोशल मीडियावर खूप सामान्य आहे. तरुण लोक सतत ऑनलाइन राहतात कारण त्यांना काहीतरी चुकतंय असं वाटू नये. इंस्टाग्रामवर नवीन पोस्ट्स पाहणं, ट्रेंडिंग रील्स चेक करणं, स्नॅपचॅट streak ठेवणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ते गुंतलेले असतात. हे सगळं सुरुवातीला मजेदार वाटू शकतं, पण जसजसा वेळ जातो, तसतसं हे सतत फोन चेक करणं आणि तासन् तास स्क्रीनवर राहणं मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतं.

हेदेखील वाचा – World Mental Health Day: अडचणींचा सामना करताना युवकांचे मानसिक आरोग्य, काय होतोय परिणाम

असुरक्षितता होते निर्माण

दुसऱ्याबाबत जास्त विचार

दररोज प्रभावशाली व्यक्तींचे किंवा आपल्याच ओळखीच्या लोकांचे सुंदर फोटो पाहत राहणं, ज्यांना अनेकदा फिल्टर्स वापरून किंवा फोटोशॉपच्या मदतीने संपादित केलेलं असतं, यामुळे तरुणांमध्ये शरीराच्या प्रतिमेबद्दल (बॉडी इमेज) असुरक्षितता निर्माण होऊ शकते. आणि ह्याचमुळे खाण्याचे विकार किंवा आत्मसन्मान कमी होण्यासारखे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात.

दुसऱ्यांशी सतत तुलना करणे, मित्रांचं प्रमोशन, त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो पाहून असूया वाटणे, हे सर्व आपला आत्मविश्वास आणि प्रेरणाशक्ती कमी करू शकतात. आणि अशा प्रकारे हे सर्व मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्यांना जन्म देऊ शकतात, जसं की नैराश्य किंवा चिंता विकार.

हेदेखील वाचा – मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ‘या’ कला ठरतील प्रभावी, मेंदूत होईल सुधारणा

काय उपाय करावे

कोणते उपाय करणं ठरेल फायदेशीर

पालकांनी आपल्या मुलांना सोशल मीडियाच्या नकारात्मक परिणामांपासून वाचवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणूनच, काही साधे उपाय केले जाऊ शकतात:

  • किशोरवयीन मुलांच्या फोन वापरण्यावर मर्यादा घाला. उदाहरणार्थ, जेवणाच्या वेळेत किंवा झोपण्याच्या आधी फोन वापरणं टाळा
  • मुलांनी अशा लोकांना फॉलो करावं, ज्यामुळे नकारात्मक भावना येणार नाहीत
  • फोनच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश झोपेवर परिणाम करू शकतो, म्हणून त्याबद्दल मुलांना समजावून सांगा
  • सोशल मीडियावर सायबरबुलिंग (ऑनलाइन छळ) हा अजून एक मोठा मुद्दा आहे. अभ्यासांनुसार, सायबरबुलिंग करणाऱ्या व्यक्तींचा इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष असतो आणि दुसऱ्यांना त्रास देण्यात त्यांना आनंद मिळतो. बहुतांश वेळा, हे छळ करणारे लोकं त्यांच्या परिचित व्यक्तींना लक्ष्य करतात – हे त्यांचे मित्र किंवा जुने जोडीदार असू शकतात
  • या समस्येवर उपाय म्हणून जागरूकता पसरवणं महत्त्वाचं आहे. शाळांमध्ये समुपदेशकांमार्फत मार्गदर्शन केलं जावं, मानसिक आरोग्य शिबिरं घ्यावीत, आणि इतर उपाय योजना राबवाव्यात. पालक आणि मुलांनी सायबरबुलिंगचे परिणाम समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामुळे मुलं पालकांशी मोकळेपणाने बोलतील आणि योग्य मदत मिळवतील.
आजकाल “मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे” हा नारा अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या अनुभवांमुळे अधिक चर्चेत आहे. हे अत्यावश्यक आहे की आपण डिजिटल जगाच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची चर्चा करावी आणि आपल्या तरुणांना स्वस्थ आणि उज्वल भविष्यासाठी योग्य दिशा दाखवावी.

Web Title: Social media s impact on mental health the reality beyond the screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • Health News
  • world mental health day

संबंधित बातम्या

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट
1

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
2

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
3

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Heart Disease: Intermittent Fasting मुळे वाढू शकतात हृदयाचे आजार? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
4

Heart Disease: Intermittent Fasting मुळे वाढू शकतात हृदयाचे आजार? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.