Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

health news: श्वसननलिकेत अडकला शेंगदाणा ठरला जीवघेणा; जसलोकच्या डॉक्टरांनी दिले बाळाला जीवनदान

health news: मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी २३ महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकलेला शेंगदाणा प्रगत ब्रॉन्कोस्कोपी आणि क्रायो-तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वीरीत्या बाहेर काढला. शेंगदाणा अडकल्यामुळे बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 20, 2026 | 05:48 PM
Peanut stuck in windpipe proves life-threatening; doctors save baby's life (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Peanut stuck in windpipe proves life-threatening; doctors save baby's life (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • शेंगदाणा अडकल्यामुळॆ बाळाला श्वसनक्रियेत होत होता त्रास
  • तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि उलट्या या लक्षणांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
  • प्रगत ब्रॉन्कोस्कोपीद्वारे बाळाच्या श्वसनमार्गातील अडथळा दूर करण्यात आला.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत २३ महिन्यांच्या पृथ्वीक खेडेकर या बाळाच्या डाव्या मुख्य श्वसननलिकेत अडकलेला शेंगदाणा सुरक्षितपणे बाहेर काढला आहे. प्रगत फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपी आणि क्रायो-तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यात आले. (health news)

आजारी असल्यामुळे बाळाला दाखल करण्यात आले पण शेंगदाणे खाताना बाळाला ठसका लागला होता

बाळाला दोन दिवसांपासून तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि उलट्या या लक्षणांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शेंगदाणे खाताना बाळाला ठसका लागला होता; प्रथमोपचारांमुळे अर्धा शेंगदाणा बाहेर पडला, मात्र उरलेला तुकडा श्वसननलिकेत खोलवर जाऊन अडकला होता. छातीच्या एचआरसीटी तपासणीत डाव्या मुख्य श्वसननलिकेचा मार्ग जवळपास पूर्णपणे बंद झाल्याचे आणि बाळाचे डावे फुफ्फुस हवा भरून फुगल्याचे व सूज आल्याचे स्पष्ट झाले.

office culture: गैरसमजामुळे बॉसने तुमच्याबद्दल नकारात्मक मत बनवले आहे? प्रतिमा सुधारण्यासाठी वापरा हे ५ मार्ग

बाळ अतिशय लहान असल्यामुळे योग्य प्रक्रियेद्वारे त्यावर उपचार

बाळाचे अतिशय लहान वय लक्षात घेता रक्तस्रावाचा धोका आणि मऊ झालेला शेंगदाणा तुटून फुफ्फुसात अधिक खोलवर जाण्याची भीती होती. डॉक्टरांनी प्रथम व्हर्च्युअल ब्रॉन्कोस्कोपीद्वारे शेंगदाण्याचे अचूक स्थान निश्चित केले. त्यानंतर ४ मिमी फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोप आणि १.१ मिमी क्रायोप्रोबच्या साहाय्याने ०.४ x ०.७ सेंमी आकाराचा शेंगदाणा गोठवून घट्ट पकडला आणि बाहेर काढला. तसेच श्वसननलिकेतील सूज कमी करण्यासाठी ‘क्रायो-डीबल्किंग’ प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे.

Women Health: सतत तणावाखाली राहिल्यामुळे पोट वाढते,कसे कमी कराल? जाणून घ्या

सर्व डॉक्टरांच्या मेहनतीला आले यश

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे रेस्पायरेटरी फिजिशियन आणि इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. कुशल चिडगुपकर म्हणाले, “लहान मुलांच्या श्वसननलिकेत अन्नकण अडकणे ही अत्यंत धोकादायक आणीबाणीची परिस्थिती असते, ज्यामुळे गंभीर संसर्ग होऊ शकतो. क्रायोप्रोबसह फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपचा वापर केल्यामुळे आम्हाला शेंगदाणा गोठवून बाहेर काढता आला आणि श्वसननलिकेतील सूजही कमी करता आली. ही मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धत लहान मुलांसाठी अत्यंत सुरक्षित असून रुग्ण लवकर बरा होण्यास मदत करते.”

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र हरियान म्हणाले, “या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी आमच्या वैद्यकीय टीमने दाखवलेले कौशल्य आणि तत्पर समन्वयाचा आम्हाला अभिमान आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लहान मुलांच्या श्वसननलिकेत काही अडकल्याची लक्षणे कोणती?

    Ans: अचानक खोकला येणे, ठसका लागणे, श्वास घेताना आवाज होणे, धाप लागणे, घरघर आणि ओठ निळसर पडणे ही संभाव्य लक्षणे आहेत. काही वेळा सुरुवातीचा ठसका थांबल्यानंतरही खोकला किंवा श्वास घेण्याचा त्रास कायम राहू शकतो.

  • Que: ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे काय?

    Ans: ब्रॉन्कोस्कोपी ही श्वसनमार्गाची तपासणी आणि उपचार करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये विशेष उपकरणाद्वारे श्वसननलिकेच्या आतील भागाचे निरीक्षण केले जाते आणि आवश्यक असल्यास अडकलेली परकी वस्तू बाहेर काढली जाते.

  • Que: क्रायो-तंत्रज्ञानाचा वापर करून श्वसननलिकेतील वस्तू कशी काढली जाते?

    Ans: क्रायो-तंत्रज्ञानामध्ये अतिथंड प्रोबच्या साहाय्याने परकी वस्तू गोठवून उपकरणाला घट्ट चिकटवली जाते. त्यानंतर डॉक्टर ती नियंत्रित पद्धतीने बाहेर काढतात. कोणते तंत्र वापरायचे हे रुग्णाचे वय, वस्तूचा आकार आणि तिचे स्थान यावर अवलंबून असते.

Web Title: Peanut stuck in windpipe proves life threatening sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Child Health
  • Health News
  • Hospital

संबंधित बातम्या

Health Tips: दोन आठवड्यांपासून खोकला थांबत नाहीये? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा धोका
1

Health Tips: दोन आठवड्यांपासून खोकला थांबत नाहीये? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा धोका

Wadia Maternity Hospital: केट मिडलटन यांची मुंबईतील वाडिया प्रसूतिगृहाला भेट; डॉक्टर, नवमाता आणि कुटुंबीयांशी साधला संवाद
2

Wadia Maternity Hospital: केट मिडलटन यांची मुंबईतील वाडिया प्रसूतिगृहाला भेट; डॉक्टर, नवमाता आणि कुटुंबीयांशी साधला संवाद

जेवणानंतर वाढणाऱ्या ग्लुकोजची चिंता मिटणार? ModiCare ने लॉन्च केले ‘ShiftLife Anti-Spike Daily’, ब्रिटिश पोषण विज्ञान आता भारतात
3

जेवणानंतर वाढणाऱ्या ग्लुकोजची चिंता मिटणार? ModiCare ने लॉन्च केले ‘ShiftLife Anti-Spike Daily’, ब्रिटिश पोषण विज्ञान आता भारतात

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात
4

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.