Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sparks Launches : स्पार्क्सची ‘ग्रेटेस्ट ऑफ टुडे’ मोहीम सुरू; तमन्ना आणि लक्ष्य ब्रँड अॅम्बेसेडर

Sparks Launches : मोहिमेत अभिनेत्री तमन्ना आणि अभिनेता लक्ष्य ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी झाले आहेत. ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT) या लोकप्रिय संज्ञेपासून प्रेरणा घेत, वर्तमान क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्याचा संदेश या मोहिमेतून दिला जात आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 13, 2026 | 08:26 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘GOAT’ या लोकप्रिय संज्ञेपासून प्रेरणा 
  • स्नीकर्स स्टाइलची ठळक अभिव्यक्ती 
  • ग्रेटेस्ट ऑफ टुडे ही केवळ जाहिरात मोहीम नसून, स्पार्क्सची नवी ओळख करणारी सुरुवात 
Sparks Launches :  सतत नवनिर्मिती, प्रयोग आणि स्वतःची अभिव्यक्ती यांना महत्त्व देणाऱ्या आजच्या तरुण पिढीसाठी ‘परिपूर्ण क्षणा’ची वाट पाहणे आता मागे पडत आहे. या बदलत्या जीवनशैलीशी जोडण्यासाठी भारतातील लोकप्रिय फुटवेअर ब्रँड ‘स्पार्क्स’ने ‘ग्रेटेस्ट ऑफ टुडे’ ही नवी ब्रँड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अभिनेत्री तमन्ना भाटीया  आणि अभिनेता लक्ष्य ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी झाले आहेत.

या मोहिमेच्या केंद्रस्थानी स्पार्क्सच्या नव्या स्नीकर्स आणि बहुपयोगी स्पोर्ट्स शूजची श्रेणी आहे. तरुण ग्राहकांच्या सक्रिय आणि गतिमान जीवनशैलीला पूरक ठरतील, अशा पद्धतीने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत.

‘GOAT’ या लोकप्रिय संज्ञेपासून प्रेरणा

‘बीबीडीओ ग्रुप इंडिया’चा भाग असलेल्या ‘मुद्रा’ संस्थेने या मोहिमेची संकल्पना मांडली आहे. ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ अर्थात ‘GOAT’ या लोकप्रिय संज्ञेपासून प्रेरणा घेत, त्याचे ‘ग्रेटेस्ट ऑफ टुडे’ असे नवे रूप या मोहिमेत मांडण्यात आले आहे. एखाद्या निर्णायक क्षणाची वाट पाहण्यापेक्षा सध्याच्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्याची आणि तो अर्थपूर्ण बनवण्याची वृत्ती या मोहिमेतून अधोरेखित केली आहे.

Ragi Momos Recipe: मैद्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा चविष्ट मोमोज,नोट करा रेसिपी

स्नीकर्स स्टाइलची ठळक अभिव्यक्ती

रिलॅक्सो फुटवेअर्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक गौरवकुमार दुआ म्हणाले, की‘* आजच्या पिढीसाठी मोठेपण म्हणजे दूरच्या यशाची किंवा एखाद्या महत्त्वाच्या टप्प्याची वाट पाहणे नव्हे. सध्याच्या क्षणी आपण काय करतो, काय अनुभवतो आणि स्वतःची अभिव्यक्ती कशी मांडतो, याला अधिक महत्त्व आहे. ‘ग्रेटेस्ट ऑफ टुडे’च्या माध्यमातून आजच्या तरुण भारताच्या संस्कृतीशी आणि विचारसरणीशी जोडणारी संकल्पना मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची नवी उत्पादने या विचाराला पूरक आहेत. स्नीकर्स स्टाइलची ठळक अभिव्यक्ती करतात, तर बहुपयोगी स्पोर्ट्स शूज सक्रिय जीवनशैलीसाठी उपयुक्त आहेत.’

तमन्ना म्हणाली, की ‘ग्रेटेस्ट ऑफ टुडे’मधील तात्कालिकता मला विशेष भावली. आयुष्यात काही मोठे घडण्याची वाट न पाहता आपण सध्याच्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. नव्या स्नीकर्सच्या माध्यमातून स्वतःची स्टाइल आणि अभिव्यक्ती मांडता येते. आजची तरुणाई ज्या पद्धतीने कपडे घालते, नवे अनुभव घेते आणि सक्रिय राहते, त्याला ही उत्पादने सहज पूरक ठरतात.’

लक्ष्य म्हणाला, ‘ग्रेटेस्ट ऑफ टुडेची संकल्पना मला भावते; कारण ती वर्तमानात जगण्याची आणि आपल्याला उत्साहित करणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा देते. आपण नवे प्रयोग करतो, वाटेतून शिकतो आणि पुढे जात राहतो. या संग्रहातही हीच ऊर्जा दिसते. स्टाइलची वेगळी छाप पाडणारे स्नीकर्स आणि सक्रिय दिवसाची साथ देणारे स्पोर्ट्स शूज, असे दोन्ही पर्याय यात आहेत.’

ग्रेटेस्ट ऑफ टुडे ही केवळ जाहिरात मोहीम नसून, स्पार्क्सची नवी ओळख करणारी सुरुवात

‘मुद्रा’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसायप्रमुख चेतन सोनी म्हणाले,* ‘स्पार्क्सला केवळ तरुण ब्रँड म्हणून सादर करणे हा या मोहिमेचा उद्देश नव्हता. तरुण पिढी स्टाइल, ओळख आणि महत्त्वाकांक्षेकडे कशा प्रकारे पाहते, हे समजून घेणे महत्त्वाचे होते. या मोहिमेत बूट हा प्रारंभबिंदू आहे; मात्र, प्रत्येक क्षण महत्त्वाचा बनवण्याची आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची वृत्ती हा केंद्रबिंदू आहे. ग्रेटेस्ट ऑफ टुडे ही केवळ जाहिरात मोहीम नसून, स्पार्क्सची नवी ओळख अधोरेखित करणारी सुरुवात आहे.’

दूरचित्रवाणी, मुद्रित माध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आउटडोअर माध्यमांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ‘ग्रेटेस्ट ऑफ टुडे’ या संकल्पनेला स्पार्क्सच्या तरुणकेंद्री ओळखीशी जोडताना नव्या फुटवेअर संग्रहाला मोहिमेत मध्यवर्ती स्थान देण्यात आले आहे.

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

 

Web Title: Sparks greatest of today campaign tamannaah lakshya sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Tamannaah Bhatia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.