२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
१९९६: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
१९४५: युनेस्को (UNESCO) – स्थापना.
१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
१९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
१६ नोव्हेंबर जन्म
१९७३: पुल्लेला गोपीचंद – भारतीय बॅडमिंटनपटू – पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९६८: शोभाजी रेगी – भारतीय राजकारणी
१९६३: मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री
१९५३: कोडियेरी बालकृष्णन – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
१९३०: मिहिर सेन – एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती – पद्म भूषण, पद्मश्री
१९२७: श्रीराम लागू – भारतीय मराठी अभिनेते – पद्मश्री
१९०४: ननामदी अझीकीवे – नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष
१८९७: चौधरी रहमत अली – भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक
१८९४: धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी
१८९०: एल्पिडियो क्विरिनो – फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष
१८३६: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा
इ. स. पू ४२: तिबेरीयस – रोमन सम्राट
१६ नोव्हेंबर निधन
२००६: मिल्टन फ्रिडमन – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
१९६७: रोशन – संगीतकार
१९६०: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेते
१९५०: डॉ. बॉब स्मिथ – अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस संस्थेचे सहसंस्थापक
१९४७: ज्युसेप्पे वोल्पी – व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक
१९१५: विष्णू गणेश पिंगळे – गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक
Web Title: Special day 16 november 2022 birthday of sobhaji regi indian politician nrrd