सकाळी उठल्यावर 'या' पाण्याचे सेवन सुरु करा; आतड्यांमधील सर्व घाण मुळापासून होईल साफ
आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि अन्य चुकीच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होत असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, सदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारात एका घरगुती पेयाचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. अलीकडेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की जर जिरे, धणे आणि मेथीपासून बनवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायले तर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात त्याचा चमत्कारिक परिणाम होतो.
केवळ 15 दिवसात कोलेस्ट्रॉलचा उडेल फज्जा, रोज सकाळी उपाशीपोटी खाल ‘हा’ मसाला; होईल कमाल
मेट्रो हॉस्पिटल फरीदाबादचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी संचालक डॉ. विशाल खुराणा यांच्या मते, या तिन्ही मसाल्यांमध्ये असलेले फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म पचन प्रक्रियेला गती देण्याचे काम करतात. यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. हा पेय फक्त पोटाच्या समस्या दूर करत नाही तर मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करण्यास देखील मदत करते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्याचे सेवन केले तर याचा तुमच्या त्वचेवरही उत्तम परिणाम दिसून येईल. हे पाणी घरीच अगदी सहज बनवले जाऊ शकते आणि यासाठी फार काही साहित्याचीही गरज भासत नाही. १००% नैसर्गिक असणाऱ्या या पाण्याचे या आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
घरगुती मसाल्यापासून तयार करा औषधी पाणी
हे पेय आपण घरीच काही घरगुती पदार्थांपासून तयार करणार आहोत. यासाठी जिरे, धणे आणि मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी यातील अतिरिक्त पाणी गाळून टाका आणि रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते हलके गरम करून देखील याचे सेवन करू शकता. हे चवीला हलके असते आणि पोटासाठी फार फायदेशीर ठरते. यात खनिजे आणि फायटोकेमिकल्स आढळून येतात जे शरीराला आतून स्वच्छ करण्याचे काम करतात. ज्यांना बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी विशेषतः फायदेशीर आहे.
आतड्यांमधील घाण होईल साफ
या पेयामध्ये असलेले फायबर आणि पाचक एंजाइम आतड्यांवरील अस्तरांवर जमा झालेले अशुद्धी हळूवारपणे काढून टाकण्यास मदत करतात. नियमित याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात शिवाय ते शरीरात नवीन घाण निर्माण होण्यापासूनही रोखते. जिरे पोटफुगी कमी करते, मेथी आतड्यांना आराम देते आणि धणे गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते. याच्या नियमित सेवनाने तुमचे पोट हलके, मन आनंदी आणि शरीर उत्साही वाटेल. ज्या लोकांना नियमित पोटाच्या समस्या उद्धभवत असतात, त्यांच्यासाठी हे पेय एक रामबाण उपाय आहे.
शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर, अॅसिडिटीचा त्रासही होईल दूर; फक्त ‘या’ पांढऱ्या फळाचे सेवन करा
कोणत्या लोकांनी याच सेवन टाळावे?
हे पेय आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरत असले तरी, काही परिस्थितींमध्ये, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करायला हवे. विशेष करून, गर्भवती महिला, कमी रक्तदाब असलेले लोक किंवा ज्यांना वारंवार डिहायड्रेशनचा त्रास होतो त्यांनी या पाण्याचे काळजीपूर्वक सेवन करायला हवे. कोणतीही नवीन हेल्थ हॅबिट स्वीकारण्यापूर्वी, तुमच्या मेडिकल हिस्ट्रीनुसार निर्णय घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला यातील कोणत्याही पदार्थापासून ऍलर्जी असेल तर चुकूनही याचे सेवन करू नका.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.